परिणीतीचे टॉप सिक्रेट आयटम साँग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 12:36 IST2016-06-29T07:03:07+5:302016-06-29T12:36:29+5:30
बॉलीवूडमध्ये जर एखादी हीरोईन आयटम साँग करणार असेल तर त्याची सुरूवातीपासूनच चर्चा होते. मग असे असताना परिणीती करत असलेल्या ...

परिणीतीचे टॉप सिक्रेट आयटम साँग
मग असे असताना परिणीती करत असलेल्या एका आयटम नंबरबद्दल एवढी गुप्ताता का बाळगली जातेय?
वरूण-जॅकलिन-जॉन स्टारर ‘ढिश्शूम’ चित्रपटात परिणीती एक आयटम साँग करत असून त्याची शुटिंग मुंबईतील मेहबुब स्टुडिओजमध्ये सुरू आहे.
पण याची कुठेच वाच्यता केली जात नाहीए. सेटच्या बाहेर नेहमीपेक्षा जास्त सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले असून गाण्याचे बोल किंवा सेटवरील फोटो लीक होऊ नये म्हणून एवढी काळजी घेतली जात आहे.
हे गाणे वरूण धवन आणि परिणीतीवर चित्रित करण्यात येत आहे, अशी माहिती मिळत आहे.
आता एवढी सुरक्षा पाळली जातेय म्हटल्यावर हे गाणे खूपच स्पेशल असले पाहिजे. अन्यथा मग इतकी काळजी करून काय फायदा?