मामला पूरा फिल्मी है..! 'तुंबाड' फेम अभिनेत्याच्या घरी झाली चोरी, असा तावडीत सापडला चोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 20:03 IST2020-06-08T20:02:30+5:302020-06-08T20:03:09+5:30
बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक सोहम शाह याच्या घरात चोरी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

मामला पूरा फिल्मी है..! 'तुंबाड' फेम अभिनेत्याच्या घरी झाली चोरी, असा तावडीत सापडला चोर
बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक सोहम शाह याच्या घरात चोरी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. मात्र, चोरट्यांना लगेचच पकडण्यात आले आहे. चोरांना पकडल्यानंतर मुंबई पोलिसांनी ट्वीट करून याविषयीची माहिती दिली. सोहम शाह यांनी जवळच्याच जुहू पोलिस स्टेशनमध्ये चोरीची तक्रार केली होती. सोहम शाह यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास केला.
सीसीटीव्हीमध्ये पाहिले गेलेले हे दोन चोर शाह यांच्या इमारतीत शिरताना आणि बाहेर पडताना दिसत होते. दोन्ही चोरट्यांनी त्यांच्या चेहर्यांवर मास्क घातले होते, मात्र त्यातील एका चोरट्याच्या डाव्या हातावर 'मलिका' नावाचा टॅटू काढलेला होता. या टॅटूच्या आधारे पोलिसांनी विलेपार्ले येथील इंदिरा नगर येथून आरोपी प्रेम लंगनाथान देवेंद्र (वय २६) याला अटक केली. २६ मे रोजी शहा यांच्या घरातून २ सेल फोन आणि ३०००ची रोख रक्कम चोरून आरोपी फरार झाला होता. या आरोपींकडून पोलिसांनी पैसे आणि मोबाइल जप्त केले आहेत. मात्र यातील दुसरा आरोपी असलेला सुरेश प्रभू याचा पोलिस शोध घेत आहेत.
A burglar broke into Sohum Shah’s Juhu home & stole 2 mobile phones & Rs. 3000 cash. API Ganesh Todkar, PSI Ajay Bhosale & team from Juhu PStn analysed CCTV footages & nabbed the accused based on a tattoo on his left arm. Search for his accomplice is on.#MumbaiFirstpic.twitter.com/t0TRLXqNS9
— Mumbai Police (@MumbaiPolice) June 6, 2020
सोहम शाहच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याने 'सिमरन', 'तुंबाड,' 'शिप ऑफ थेसीस' या चित्रपटात काम केले आहे.