Then And Now : ‘तुम बिन’चा या हिरोला ओळखणंही झालं कठीण, 17 किसींग सीन्स देऊनही ठरला ‘फ्लॉप’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 08:00 AM2022-01-02T08:00:00+5:302022-01-02T08:00:06+5:30

Then And Now Pics: एकेकाळी त्याच्या चार्मिंग लुकवर तरूणी फिदा होत्या, आज पाहाल तर विश्वास बसणार नाही...

tum bin fame actor himanshu malik drastically change now see pics | Then And Now : ‘तुम बिन’चा या हिरोला ओळखणंही झालं कठीण, 17 किसींग सीन्स देऊनही ठरला ‘फ्लॉप’

Then And Now : ‘तुम बिन’चा या हिरोला ओळखणंही झालं कठीण, 17 किसींग सीन्स देऊनही ठरला ‘फ्लॉप’

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये स्टार बनायला सगळेच येतात. पण मोजकेचं स्टार बनून रसिकांच्या गळ्यातले ताईत होतात. अनेक कलाकार तर कधी येतात आणि कधी जातात तेही कळत नाही. हिमांशू मलिक हा असाच एक अभिनेता. पहिल्या सिनेमात तो चमकला पण नंतर बॉलिवूडमधून असा काही गायब झाला की, आज त्याचं नावही अनेकांच्या स्मरणात नाही. इतकंच काय, आत्ताचा त्याचा लूक पाहून त्याला कुणी ओळखूही शकणार नाही.

2001 मध्ये अनुभव सिन्हांनी दिग्दर्शित केलेल्या ‘तुम बिन’ या चित्रपटात हिमांशू मलिक दिसला होता. प्रियांशू चॅटर्जी, संदली सिन्हा, राकेश वशिष्ठसोबत हिमांशूही होता. चित्रपट प्रचंड गाजला होता. सिनेमाची गाणी तर तुफान वाजली होती. सिनेमा हिट झाला तसा हिमांशू सुद्धा यशस्वी कलाकारांच्या रांगेत येऊन बसला. त्याच्या चार्मिंग लूकमुळे तरुणी फिदा होत्या.

खरं तर ‘तुम बिन’ हा हिमांशूचा पहिला सिनेमा नव्हता. 1996 मध्ये ‘कामसूत्र - द टेल ऑफ स्टोरी’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर तो ‘जंगल’ या चित्रपटातही दिसला. मल्लिका शेरावतच्या ‘ख्वाहिश’ या सिनेमात 17 किसींग सीन्स देऊन तो चर्चेत आला होता. एलओसी कारगील, रोग, रेन असे अनेक सिनेमे हिमांशूच्या वाट्याला आले. पण सगळेच सुमार ठरले. यानंतर हिमांशूला हळूहळू काम मिळणं बंद झालं आणि तो बॉलिवूडमधून गायब झाला.

अ‍ॅक्टिंगमध्ये फार काही जम बसत नाही म्हटल्यावर हिमांशू प्रोड्यूसर बनला. पण इथही त्याच्या वाट्याला अपयश आलं. सध्या हिमांशू अज्ञासवासात जगतोय. त्याचा लूकही प्रचंड बदललाये. वजन वाढल्याने हाच तो यावर क्षणभर विश्वास बसत नाही.  इंटरनेटवर त्याचा सध्याचे फोटो पाहायला मिळतात. पण आता तो काय करतो? कुठे आहे? याबाबत फार कुणालाच माहिती नाही.
हिंमाशूने आपल्या करिअरची सुरुवातीला मॉडेलिंगपासून केली होती. त्यानंतर आलेला त्याचा ‘दीवाना’ हा अल्बम गाजला होता.

Web Title: tum bin fame actor himanshu malik drastically change now see pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.