'धडक २'मध्ये पहिल्यांदा एकत्र दिसणार तृप्ती डिमरी-सिद्धांत चतुर्वेदी, या दिवशी सिनेमा येणार भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 09:12 IST2025-05-27T09:12:05+5:302025-05-27T09:12:30+5:30
Dhadak 2 Movie : 'धडक २' चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.

'धडक २'मध्ये पहिल्यांदा एकत्र दिसणार तृप्ती डिमरी-सिद्धांत चतुर्वेदी, या दिवशी सिनेमा येणार भेटीला
'धडक २' (Dhadak 2 Movie) चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि तृप्ती डिमरी (Trupti Dimri) पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्स निर्मित आणि शाजिया इक्बाल यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचे पहिले पोस्टर २६ मे रोजी प्रदर्शित झाले. ज्यामध्ये एका रोमँटिक ड्रामाची झलक दाखवण्यात आली आहे.
'धडक २' चित्रपटाच्या पोस्टर्समध्ये दोन्ही प्रमुख कलाकारांमधील भावनिक क्षण दाखवण्यात आले आहेत. एका पोस्टरमध्ये सिद्धांत त्याच्या प्रेयसीला मिठी मारताना दिसत आहे आणि तिला जगापासून वाचवत आहे, तर दुसऱ्यामध्ये तृप्ती डिमरी त्याला मिठी मारताना दिसत आहे. पोस्टरसोबत कॅप्शन लिहिले आहे की, "जर तुम्हाला मरणे आणि लढणे यापैकी एक निवडायचे असेल तर लढा," या पोस्टरमधून समजते की, हा चित्रपट प्रेमासाठी लढलेल्या लढाईच्या कथेवर आधारित आहे. हा चित्रपट समाजातील जात आणि वर्गभेद यासारख्या संवेदनशील मुद्द्यांना स्पर्श करतो, ज्यामुळे तो सामान्य प्रेमकथेपेक्षा वेगळा असेल.
'धडक २' १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून U/A प्रमाणपत्र मिळाले आहे. मात्र, सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात १६ सुधारणा देखील सुचवल्या आहेत. यामध्ये राजकीय किंवा धार्मिकदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या काही संवादांमध्ये बदल सांगितले आहेत. 'धडक २' हा चित्रपट २०१८ मध्ये आलेल्या 'धडक' चित्रपटाचा सीक्वल आहे. जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरने पहिल्या भागात काम केले होते. 'धडक २' ची कथा आणि पात्रे पूर्णपणे नवीन असली तरी, ती पुन्हा एकदा समाजातील प्रेम आणि भेदभाव यांच्यातील संघर्ष समोर आणेल.