वास्तववादी वाटण्यासाठी या सिनेमात खऱ्या काश्मिरी पंडितांनी केलंय काम, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 06:00 IST2020-01-15T06:00:00+5:302020-01-15T06:00:00+5:30
वास्तववादी चित्रपट वाटण्यासाठी खऱ्या काश्मिरी पंडितांचा निर्मात्यांनी समावेश केला आहे.

वास्तववादी वाटण्यासाठी या सिनेमात खऱ्या काश्मिरी पंडितांनी केलंय काम, वाचा सविस्तर
निर्माते विधु विनोद चोप्रा यांचा आगामी चित्रपट 'शिकारा' गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. याचे महत्त्वाचं कारण म्हणजे काश्मिरी पंडितांचे दुःख आणि वेदना मांडणाऱ्या या चित्रपटात काश्मिरी पंडितांनाच चित्रित करण्यात आले आहे. निर्माता विधु विनोद चोपड़ा या चित्रपटाबाबत अतिशय संवेदनशील असून चित्रपटाची प्रत्येक गोष्ट वास्तवदर्शी असावी हा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि म्हणूनच त्यांनी या चित्रपटासाठी खरोखरच्या काश्मिरी पंडितांसोबत या चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे.
शिकारा चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. समाजात उग्रवाद कशा तऱ्हेने एक महत्त्वपूर्ण कारण बनून समोर येतो. त्यामुळे ४ लाख भारतीयांना आपले घर सोडावे लागते आणि पुढचे सर्व आयुष्य शरणार्थ्यांप्रमाणे घालवावे लागते, हे या चित्रपटात रेखाटण्यात आला आहे.
शिकारा या चित्रपटाद्वारे निर्माता विधू विनोद चोपडा यांनी आपल्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे.
हा चित्रपट ७ फेब्रुवारी २०२० ला प्रदर्शित होत आहे.
फॉक्स स्टार स्टूडियोज द्वारे प्रस्तुत, हा चित्रपट विनोद चोपड़ा प्रोडक्शन्सद्वारे निर्मित आणि फॉक्स स्टार स्टूडियो द्वारे सह-निर्मित आहे.