‘जंगलबुक’मध्ये खरे प्राणी नाहीत पपेट्स!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 19:14 IST2016-04-06T00:27:10+5:302016-04-06T19:14:38+5:30

‘जंगलबुक’मधील मोगली आणि त्याचे जंगलातील प्राणी मित्र  या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात नील सेठी हा मोगलीची ...

True animals are not in the jungle book. | ‘जंगलबुक’मध्ये खरे प्राणी नाहीत पपेट्स!!

‘जंगलबुक’मध्ये खरे प्राणी नाहीत पपेट्स!!

ंगलबुक’मधील मोगली आणि त्याचे जंगलातील प्राणी मित्र  या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात नील सेठी हा मोगलीची भूमिका साकारत आहे. सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी असलेला नील मुळचा भारताचा आहे. अलीकडे तो भारतातही प्रमोशनसाठी येऊन गेला. ‘जंगलबुक’मधील प्राणी, प्राण्यांसोबतचा मोगलीचा संवाद हे सर्व पाहण्यासाठी बडे-बच्चे सगळेच जाम उत्सूक आहेत. पण तुम्हाला माहितीयं, चित्रपटात आपल्याला पडद्यावर दिसणारे बरेच प्राणी खरेखुरे नसून पपेट्स आहेत. होय. खुद्द नीलने ही बाब उघड केली. शूटींगदरम्यान खºयाखुºया प्राण्यांऐवजी पपेट्सचा वापर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या पपेट्ससोबत शूटींग करताना जाम मज्जा आल्याचेही तो म्हणाला...आहे ना गंमत!!!
.........................
 
​शॉकिंग...‘जंगलबुक’ला UA certificate
शिर्षक वाचून आश्चर्य वाटले ना, आम्हालाही वाटले.खास मुलांसाठी बनलेल्या या चित्रपटाला सेन्सॉर बोर्ड आॅफ फिल्म सर्टिफिकेशन(सीबीएफसी)ने युए प्रमाणपत्र दिल्याचे कळते. साहजिकच यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. हा चित्रपट जंगलबुक हा मुळात कथांचा एक संग्रह म्हणजे कथासंग्रह आहे. बच्चे कंपनीच्या आॅलटाईम फेवरेट असलेल्या या कथासंग्रहावर आधारित ‘जंगलबुक’ हा सिनेमा येत्या ८ एप्रिलला जगभर रिलीज होतो आहे. याच चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने यूए प्रमाणपत्र दिले आहे. यासंदर्भात सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना विचारले असता, त्यांनी या निर्णयाचे समर्थन केले. केवळ जंगलबुक या नॉवेलची महती गाऊ नका. आधी त्यावर तयार झालेला चित्रपट बघा आणि नंतर आम्ही घेतलेल्या निर्णयाची चिरफाड करा, असे ते म्हणाले. या चित्रपटातील अनेक ३ डी इफेक्ट भीतिदायक आहेत. यातील प्राणी थेट प्रेक्षकांच्या अंगावर उड्या घेतात. अशास्थितीत हे थ्रीडी इफेक्ट आपली मुले सहन करू शकतील की, नाही याचा निर्णय पालकांना घ्यायचा आहे. युए प्रमाणपत्राने पालकांना हा अधिकार दिला आहे, असे ते म्हणाले.
युए श्रेणीतील चित्रपटातील काही दृश्यांध्ये अश्लील भाषा, लैंगिक सामग्री वा हिंसा असू श्कते. या श्रेणीचे चित्रपट केवळ १४ वर्षांवरील व्यक्ति त्यांच्या पालकांच्या उपस्थितीतच पाहू शकतात.
 

Web Title: True animals are not in the jungle book.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.