ट्रोल करणाऱ्यावर तापसी पन्नू संतापली; वाचा तिने नेमके काय म्हटले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2018 15:40 IST2018-01-13T10:10:45+5:302018-01-13T15:40:55+5:30
छोट्या कपड्यांवरून नेहमीच ट्रोल होणाºया तापसी पन्नूने ट्रोलर्सला चांगलेच सुनावले. दुसºयांवर टीका करून त्यांचा आत्मविश्वास संपविण्याचा प्रयत्न करू नये असे तिने म्हटले.

ट्रोल करणाऱ्यावर तापसी पन्नू संतापली; वाचा तिने नेमके काय म्हटले?
स उथ चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये नशीब आजमावत असलेली अभिनेत्री तापसी पन्नू हिने सोशल मीडियावर ट्रोल करणाºया यूजर्सला उत्तर दिले आहे. तिच्या मते, सोशल मीडियाने लोकांना कोणाचीही खिल्ली उडविण्याची किंवा त्यांच्यावर टीका करण्याचा जणू काही परवानाच दिला आहे. तापसीने म्हटले की, ‘सोशल मीडियाने लोकांना लोकांची चेष्टा करण्याचा परवानाच दिला आहे. कारण लोकांना अजूनही कळत नाही की, त्यांच्या अशाप्रकारच्या टीकेमुळे एखाद्याचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो.
बिकिनी आणि छोट्या कपड्यांवरून तापसी नेहमीच सोशल मीडियावर ट्रोल होत असते. आता लवकरच ती छोट्या पडद्यावर ‘ट्रोल पुलिस’ हा नवा शो घेऊन येत असून, ती या मुद्दावर आपले मत मांडताना दिसणार आहे. या शोमध्ये प्रसिद्ध सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. या शोविषयी बोलताना तापसीने म्हटले की, मी लोकांना संदेश देऊ इच्छिते की, सभ्यपणाचे धडे देताना इंटरनेटचा वाट्टेल तो उपयोग केला जाऊ नये.
सध्या तापसीचे इन्स्टाग्रामवर पाच लाखांपेक्षा अधिक फॉलोवर आहेत. शोच्या पहिल्या भागात ती लखनऊ येथील आशिष नावाच्या एका विद्यार्थ्यासमोर बघावयास मिळणार आहे. हा शो दर शनिवारी एम टीव्हीवर प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान, तापसी आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये बघावयास मिळाली आहे. मात्र अजूनही तिला अपेक्षित असे यश मिळाले नाही.