दुःखातून अद्याप सावरू शकली नाही बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्याची लेक, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 14:14 IST2019-08-02T14:14:00+5:302019-08-02T14:14:36+5:30
सध्याचा काळ त्रिशालाच्या आयुष्यातील सगळ्यात वाईट काळ आहे. पण तरीही ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे.

दुःखातून अद्याप सावरू शकली नाही बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्याची लेक, वाचा सविस्तर
बॉलिवूडचा संजूबाबा उर्फ संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्तच्या बॉयफ्रेंडचं २ जुलै, २०१९ला निधन झालं. या घटनेनंतर त्रिशाला पूर्णपणे कोलमडून गेली. या दुःखातून सावरण्यासाठी ती आटोकाट प्रयत्न करते आहे. मात्र अद्याप ती यातून बाहेर पडू शकलेली नाही. तिने पुन्हा एकदा बॉयफ्रेंडच्या आठवणींना उजाळा देत सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.
त्रिशाला दत्तने बॉयफ्रेंडसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर नुकताच शेअर केला आहे. या फोटोत त्रिशाला बॉयफ्रेंडसोबत बसलेली दिसते आहे. या फोटोत दोघेही क्युट दिसत आहेत.
तिने फोटो शेअर करून लिहिलं की, आय लव यू, आय मिस यू.
संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त इटालियन बॉयफ्रेंडसोबत रिलेशनशीपमध्ये होती. त्याचे निधन झाल्यानंतर त्रिशालाने सोशल मीडियावर लिहिलं की, माझे हृदय तुटले.. माझ्यावर प्रेम करण्यासाठी, माझी काळजी घेण्यासाठी आभार. तू मला कधी नव्हे इतका आनंद दिलास. तुला भेटून मी जगातील सर्वाधिक भाग्यशाली मुलगी ठरले. तुझी होऊन मी धन्य झाले. तू कायम माझ्यात जिवंत असशील. मी तुझ्यावर प्रेम करते आणि कायम करत राहील. आपण दोघेही पुन्हा भेटत नाही तोपर्यंत मी तुला मिस करत राहील. नेहमीसाठी फक्त तुझीच...तुझीच बेला मिया...,असे त्रिशालाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले होते.
त्रिशालाने काही महिन्यांपूर्वी ती एका इटालियन तरूणाला डेट करत असल्याचा खुलासा केला होता.
बॉयफ्रेन्डसोबतचा एक फोटो शेअर करत तिने याबाबतचे संकेत दिले होते.
‘ एका इटालियनला डेट करणे म्हणजे, खूप सारा पास्ता आणि वाईन,’ असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते.