बॉयफ्रेन्डच्या अकाली मृत्यूने खचली संजय दत्तची मुलगी त्रिशाला, लिहिली भावूक पोस्ट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 13:35 IST2019-07-04T13:28:42+5:302019-07-04T13:35:10+5:30

गत २ जुलैला त्रिशालाच्या इटालियन बॉयफ्रेन्डचे अकाली निधन झाले. या घटनेनंतर त्रिशालाला स्वत:ला सावरणे कठीण जातेय.

trishala dutt pens post for boyfriend on his sudden demise | बॉयफ्रेन्डच्या अकाली मृत्यूने खचली संजय दत्तची मुलगी त्रिशाला, लिहिली भावूक पोस्ट!!

बॉयफ्रेन्डच्या अकाली मृत्यूने खचली संजय दत्तची मुलगी त्रिशाला, लिहिली भावूक पोस्ट!!

ठळक मुद्देत्रिशाला ही संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची  मुलगी आहे.

संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. बॉयफ्रेन्डच्या अनपेक्षित मृत्यूने त्रिशाला कमालीची हादरली आहे. गत २ जुलैला त्रिशालाच्या इटालियन बॉयफ्रेन्डचे अकाली निधन झाले. या घटनेनंतर त्रिशालाला स्वत:ला सावरणे कठीण जातेय. सोशल मीडियावर पोस्ट लिहून तिने तिचे दु:ख व्यक्त केले आहे.
माझे हृदय तुटले.. माझ्यावर प्रेम करण्यासाठी, माझी काळजी घेण्यासाठी आभार. तू मला कधी नव्हे इतका आनंद दिलास. तुला भेटून मी जगातील सर्वाधिक भाग्यशाली मुलगी ठरले. तुझी होऊन मी धन्य झाले. तू कायम माझ्यात जिवंत असशील. मी तुझ्यावर प्रेम करते आणि कायम करत राहिल. आपण दोघेही पुन्हा भेटत नाही तोपर्यंत मी तुला मिस करत राहिल. नेहमीसाठी फक्त तुझीच...जो तुझीच बेला मिया...,असे त्रिशालाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

त्रिशालाच्या बॉयफ्रेन्डचा मृत्यू कसा झाला, याबद्दल अधीक माहिती मिळू शकलेली नाही. काही दिवसांपूर्वी त्रिशालाने स्वत: ती एका इटालियन तरूणाला डेट करत असल्याचा खुलासा केला होता. बॉयफ्रेन्डसोबतचा एक फोटो शेअर करत, तिने याबाबतचे संकेत दिले होते. ‘ एका इटालियनला डेट करणे म्हणजे, खूप सारा पास्ता आणि वाईन,’ असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले  होते.  

त्रिशाला ही संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची  मुलगी आहे. सध्या ती फॅशन इंडस्ट्रीमध्ये नशिब आजमावत आहे. २०१४ मध्ये तिने पहिली ड्रीम ट्रेसेज हेअर एक्सटेन्शन लाइन सुरू केली होती. न्युयॉर्कमधील जॉन जे कॉलेज ऑफ क्रिमिनल जस्टिसमध्ये तिने कायद्याची पदवी घेतलीय.

१९८७ मध्ये संजय दत्तने ऋचा शमार्सोबत लग्न केले होते. त्रिशालाचा जन्म १९८८ मध्ये झाला. ऋचा ब्रेन ट्यूमर हा आजार असल्याने १० डिसेंबर १९९६ मध्ये तिचे निधन झाले. आईच्या निधनानंतर त्रिशाला न्यू यॉर्कमध्ये मावशी एनासोबत राहत आहे. संजय दत्त नेहमी तिच्या संपर्कात असून, दोघांमध्ये चांगली केमिस्ट्री आहे. याशिवाय संजय दत्तची पत्नी मान्यतासोबतही तिचे चांगले संबंध आहेत.

Web Title: trishala dutt pens post for boyfriend on his sudden demise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.