यशाच्या शिखरावर असतानाच तृप्ती डिमरीने सांगितला रिटायरमेंट प्लॅन; म्हणाली, "बॉलिवूड सोडून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 16:56 IST2024-09-26T16:55:39+5:302024-09-26T16:56:32+5:30

तृप्ती डिमरीला Animal मुळे खरी ओळख मिळाली.

Tripti Dimri reveals her retirement plan says she would go to live in the mountains | यशाच्या शिखरावर असतानाच तृप्ती डिमरीने सांगितला रिटायरमेंट प्लॅन; म्हणाली, "बॉलिवूड सोडून..."

यशाच्या शिखरावर असतानाच तृप्ती डिमरीने सांगितला रिटायरमेंट प्लॅन; म्हणाली, "बॉलिवूड सोडून..."

तृप्ती डिमरी (Tripti Dimri)  बॉलिवूडमध्ये सध्याची सर्वात चर्चेतली आणि आघाडीची अभिनेत्री आहे. Animal सिनेमानंतर तिचं नशीबच पालटलं. तिच्याकडे सिनेमांच्या रांगा लागल्या. Animal आधीही तिचे काही सिनेमे रिलीज झाले होते. मात्र तिला आता 'भाभी २' ही ओळख मिळाली. तृप्ती सध्या हे यश एन्जॉय करत असून सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्तही आहे. दरम्यान यशाच्या शिखरावर असतानाच तृप्तीने तिचा रिटायरमेंट प्लॅन सांगितला आहे.

'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत तृप्ती डिमरी म्हणाली, "मी पहाडी आहे. उत्तराखंडची आहे. मला डोंगराळ भाग आणि निसर्ग खूप आवडतो. मी तिथे खूप खूश असते. तिथे मला घरात असल्यासारखं वाटतं. तिथे जाऊन राहणं हेच माझ्यासाठी रिटायरमेंट प्लॅन असेल. मी तिकडेच जाऊन राहीन. तिथली ताजी, शुद्ध हवा, उत्कृष्ट जेवणं हे सर्वकाही तिथे आहे. मला निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन राहायला आवडतं.मी जर आज अभिनेत्री नसते तर नक्कीच वाईल्ड लाईफ फोटोग्राफर असते."


तृप्ती डिमरीने कला, लैला मजनू, बुलबुल या सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली . मात्र तिला 'अॅनिमल' मुळे लोकप्रियता मिळाली. यामध्ये तिने रणबीर कपूरसोबत न्यूड सीनही दिला ज्याची चर्चा झाली. यानंतर तृप्तीचा 'बॅड न्यूज' रिलीज झाला. तर राजकुमार रावसोबत तिचा 'विकी और विद्या का वो वाला व्हिडिओ' सिनेमा येत आहे. याशिवाय तृप्ती'भूलभूलैय्या 3','धडक 2' मध्येही झळकणार आहे.

Web Title: Tripti Dimri reveals her retirement plan says she would go to live in the mountains