Animal: 'सिनेमात जेव्हा दोन अभिनेत्री असतात त्यावेळी..'; सेटवर तृप्तीला रश्मिकाने दिली अशी वागणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 09:00 AM2023-12-10T09:00:11+5:302023-12-10T09:01:37+5:30

Tripti dimri: तृप्ती या सिनेमामुळे रातोरात प्रकाशझोतात आली. मात्र, सेटवर तिचं आणि रश्मिकाचं बॉण्डिंग फार वेगळं होतं.

tripti-dimri-fight-with-rashmika-mandanna-on-animal-set-bhabhi-no-1-bhabhi-no-2-says-when-two-heroines-are-on-set | Animal: 'सिनेमात जेव्हा दोन अभिनेत्री असतात त्यावेळी..'; सेटवर तृप्तीला रश्मिकाने दिली अशी वागणूक

Animal: 'सिनेमात जेव्हा दोन अभिनेत्री असतात त्यावेळी..'; सेटवर तृप्तीला रश्मिकाने दिली अशी वागणूक

सध्या बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor)  याचा Animal  हा सिनेमा चांगलाच गाजताना दिसतोय. अनिल कपूर (anil kapoor), बॉबी देओल (bobby deol) , रश्मिका मंदाना (rashmika Mandanna) , उपेंद्र लिमये (upendra limaye) आणि तृप्ती डिमरी (Tripti dimri)अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात झळकली आहे. हा सिनेमा रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करत आहे. आतापर्यंत या सिनेमाने जवळपास सगळेच रेकॉर्ड तोडले आहेत. या सिनेमामुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रकाशझोतात आली असून ती सातत्याने चर्चेत येत आहे. यामध्येच तिने या सिनेमात काम करत असताना रश्मिका मंदाना हिने कशी वागणूक दिली हे सांगितलं.

animal मुळे तृप्ती रातोरात चर्चेत आली असून सातत्याने ती मुलाखती देत आहे. यामध्येच एका मुलाखतीमध्ये बोलत असताना तिने रश्मिका मंदानासोबत काम करतानाचा अनुभव शेअर केला.

36 एकर जमिनीवर संदिप रेड्डी वांगा यांनी फिरवला नांगर; Animal साठी विकली वडिलोपार्जित जमीन

"ती सेटवरची सगळ्यात गोड व्यक्ती आहे. तिने स्वत:ला सेटवर माझं वेलकम केलं. खरंतर सिनेमात जेव्हा दोन अभिनेत्री असतात त्यावेळी सेटवर निगेटिव्ह एनर्जी पाहायला मिळते. मात्र, इथे असं काहीही झालं नाही. ती खूप हुशार आहे. ती माझ्या जवळ आली आणि मला मिठी मारली. इतकंच नाही तर तिने मला त्यांच्यासोबत बसायलाही सांगितलं. तिला कळत होतं की मी ऑकवर्ड फिल करतीये. पण, तिने मला खूप कम्फर्टेबल केलं. एखाद्याकडे असावा असा हा चांगला गुण आहे", असं तृप्ती म्हणाली.

पुढे तिने रणबीरसोबत काम करण्याचाही अनुभव शेअर केला. ''सेटवरचा सगळ्यात उत्साही व्यक्ती म्हणजे रणबीर. तसंच त्याला अन्य कलाकारांविषयी जाणून घ्यायलाही आवडतं." दरम्यान, animal ने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. मल्टीस्टारर असलेल्या या सिनेमात वडील आणि मुलगा यांच्या नात्यावर भाष्य करण्यात आलं आहे. या सिनेमात तृप्तीने झोया ही भूमिका साकारली आहे.

Web Title: tripti-dimri-fight-with-rashmika-mandanna-on-animal-set-bhabhi-no-1-bhabhi-no-2-says-when-two-heroines-are-on-set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.