तृप्ती डिमरीने साजरा केला वाढदिवस, किती वर्षांची झाली अभिनेत्री? बॉयफ्रेंडसोबत केलं फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 15:35 IST2026-02-27T15:35:01+5:302026-02-27T15:35:47+5:30

तृप्तीने शेअर केली भावुक पोस्ट

tripti dimri celebrated 31 st birthday with familt and friends shares photos | तृप्ती डिमरीने साजरा केला वाढदिवस, किती वर्षांची झाली अभिनेत्री? बॉयफ्रेंडसोबत केलं फोटोशूट

तृप्ती डिमरीने साजरा केला वाढदिवस, किती वर्षांची झाली अभिनेत्री? बॉयफ्रेंडसोबत केलं फोटोशूट

'कला',  'लैला मजून', 'बुलबुल' आणि नंतर 'ॲनिमल' अशा सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री तृप्ती डिमरीने काही दिवसांपूर्वी ३१ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाची झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. तृप्तीचा आउटफिट ते तिचे बॉयफ्रेंडसोबतचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

तृप्ती डिमरी २३ फेब्रुवारी रोजी ३१ वर्षांची झाली. यावेळी तिच्यासाठी मस्त पार्टी आयोजित करण्यात आली होती. ब्लॅक रंगाच्या आउटफिटमध्ये ती सुंदर दिसत होती. या खास दिवशी तृप्तीचे मित्र मंडळी कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. सर्वांसोबत तिने एन्जॉय केलं. घरातील लहान मुलांसोबत केक कट केला. तृप्तीचा आईला मिठी मारतानाचा फोटोही तिने पोस्ट केला आहे. यामध्ये आईच्या भावना कॅमेऱ्यात कॅप्चर झाल्या आहेत. तसंच इतर सदस्यांसोबतही तिने फोटो काढले. तसंच तृप्तीचा बॉयफ्रेंड सॅम मर्चंटसोबतही तिचा फोटो आहे. त्याच्या खांद्यावर हात ठेवत मस्त कोजी पोज देत, कॅमेऱ्यासमोर हसत त्यांनी फोटो काढला आहे. तिच्या वाढदिवसाला ५ केक आलेले दिसत आहेत. तसंच घरातही सुंदर डेकोरेशन केलेलं दिसत आहे. 


तृप्तीने या फोटोंसह कॅप्शन देत लिहिले, "इतकं प्रेम मिळाल्यावर मी खूप खूश आहे. जे माझ्या वाढदिवसाला आले त्यांचे आभार. ज्यांनी मेसेज केले, फोन केले आणि अगदी माझी आठवणी काढली त्यांचेही आभार. माझ्यासाठी हे किती महत्वाचं आहे हे मी शब्दात मांडू शकणार नाही."

तृप्ती डिमरी नुकतीच 'ओ रोमियो' सिनेमात दिसली. यामध्ये तिची शाहिद कपूरसोबत जोडी जमली. सिनेमातील तिच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. यानंतर तृप्ती आगामी 'स्पिरिट','माँ बहन' या सिनेमांमध्येही दिसणार आहे. तसंच 'अॅनिमल पार्क', परवीन बाबी यांच्यावरील बायोपिक या सिनेमांचीही ती तयारी करणार आहे.

Web Title : तृप्ति डिमरी ने बॉयफ्रेंड के साथ जन्मदिन मनाया: वह कितनी साल की हैं?

Web Summary : अभिनेत्री तृप्ति डिमरी ने 31वां जन्मदिन मनाया। बॉयफ्रेंड सैम मर्चेंट के साथ तस्वीरें वायरल हुईं। उन्होंने सभी को शुभकामनाओं के लिए धन्यवाद दिया। डिमरी अगली बार 'एनिमल पार्क' और परवीन बाबी की बायोपिक में दिखाई देंगी।

Web Title : Tripti Dimri Celebrates Birthday with Boyfriend: How Old is She?

Web Summary : Actress Tripti Dimri celebrated her 31st birthday with a party. Photos with her boyfriend, Sam Merchant, went viral. She thanked everyone for their wishes. Dimri will next be seen in 'Animal Park' and a Parveen Babi biopic.