ट्रान्सजेंडर बॅण्डचा व्हिडिओ जोरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:13 IST2016-02-06T02:43:29+5:302016-02-06T08:13:29+5:30
‘द सिक्स पॅक बॅण्ड’ या भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर बॅण्डचा व्हिडिओ रिलीज झालाय. या व्हिडिओला सर्व थरातून चांगली पसंती मिळत ...
.jpg)
ट्रान्सजेंडर बॅण्डचा व्हिडिओ जोरात
‘ सिक्स पॅक बॅण्ड’ या भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर बॅण्डचा व्हिडिओ रिलीज झालाय. या व्हिडिओला सर्व थरातून चांगली पसंती मिळत आहे. या बॅण्डमध्ये आशा जगताप, भाविका पटेल, चांदनी उवामकर, फिदा खान, कोमल जगताप आणि रवीना जगताप यांचा समावेश आहे. या व्हिडिओत त्यांचा प्रेम आणि आकांक्षेशी संबंधित प्रवास उलगडला आहे. यशराज फिल्म्सच्या यूथ फिल्म विंग, वाय फिल्म आणि ब्रुक बॉण्ड रेड लेबल यांच्या सहकार्याने या व्हिडिओची निर्मिती झाली आहे. ‘द सिक्स पॅक बॅण्ड’चे यू ट्यूबवर याआधी दोन व्हिडिओ रिलीज झालेत. त्यांनाही चांगला प्रतिसाद लाभला.