Trailer Out : ‘ग्लोबल वार्मिंग’वर आधारित असलेल्या ‘कार्बन’च्या ट्रेलरमध्ये पहा २०६७चा थरार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 21:06 IST2017-07-27T14:54:19+5:302017-07-27T21:06:33+5:30

​अभिनेता जॅकी भगनानी आणि नवाजुद्दीन सिद्दीकी स्टारर ‘कार्बन’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

Trailer Out: See the 2067 Thunder in 'Carbon Trailer' based on 'Global Warming'! | Trailer Out : ‘ग्लोबल वार्मिंग’वर आधारित असलेल्या ‘कार्बन’च्या ट्रेलरमध्ये पहा २०६७चा थरार!

Trailer Out : ‘ग्लोबल वार्मिंग’वर आधारित असलेल्या ‘कार्बन’च्या ट्रेलरमध्ये पहा २०६७चा थरार!

िनेता जॅकी भगनानी आणि नवाजुद्दीन सिद्दीकी स्टारर ‘कार्बन’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये ५० वर्षांनंतरचे जग दाखविण्यात आले असून, ते अंगावर शहारे आणणारे आहे. ट्रेलरमध्ये २०६७ नंतरच्या दुनियेचे वास्तव दाखविताना पृथ्वीवरील आॅक्सिजन नष्ट होत असल्याची भीती व्यक्त केली गेली आहे. त्याचबरोबर त्यावेळी कशा पद्धतीने आॅक्सिजनचा अवैध व्यवसाय चालतो अन् लोक एकमेकांच्या जिवावर उठतात हे ट्रेलरमध्ये दर्शविण्यात आले आहे. 

‘कार्बन’ एक शॉर्ट फिल्म आहे. दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये आताच्या पिढीला भविष्यातील वास्तव दाखविण्याचा प्रयत्न या लघुपटातून केला जाणार आहे. अभिनेत्री प्राची देसाई हिने चित्रपटाचे ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केले आहे. चित्रपटात प्राची दमदार भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. दरम्यान, प्राचीने पोस्ट शेअर करताना लिहिले की, ‘कार्बन’चा ट्रेलर तुमच्यासोबत शेअर करताना मी खूपच एक्साइटेड आहे.’



या लघुपटाची कथा ग्लोबल वार्मिंग आणि क्लायमेट चेंज यांसारख्या गंभीर विषयावर आधारित आहे. या चित्रपटात २०६७चा काळ दाखविला आहे. मंगळ ग्रहावरून आलेल्या एक व्यक्तीच्या भूमिकेत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी दिसणार आहे. चित्रपटात नवाजुद्दीन अतिशय हटके अंदाजात बघावयास मिळणार आहे. जॅकी भगनानी, नवाजुद्दीन सिद्दीकी, प्राची देसाई यांच्या व्यतिरिक्त यशपाल शर्मा यांच्या चित्रपटात दमदार भूमिका आहेत. चित्रपटाला मैत्री वाजपेयी हिने दिग्दर्शित केले आहे. चित्रपटाच्या रिलीजची तारीख अद्यापपर्यंत घोषित केली गेली नाही. हा चित्रपट यू-ट्यूबवर रिलीज केला जाणार आहे. 

Web Title: Trailer Out: See the 2067 Thunder in 'Carbon Trailer' based on 'Global Warming'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.