श्रिया पिळगांवकर - जितेंद्र कुमार यांच्या 'ड्राय डे' चा ट्रेलर पाहिलात का? जाणून घ्या कधी आणि कुठे प्रदर्शित होणार सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 04:52 PM2023-12-14T16:52:45+5:302023-12-14T16:54:40+5:30

'पंचायत' वेबसीरिजमधून लोकप्रिय झालेला जितेंद्र कुमार आणि मराठमोळी अभिनेत्री श्रिया पिळगांवकर 'ड्राय डे' या सिनेमात मुख्य भुमिकेत आहेत.

trailer of Shriya Pilgaonkar-Jitendra Kumar's 'Dry Day' movie | श्रिया पिळगांवकर - जितेंद्र कुमार यांच्या 'ड्राय डे' चा ट्रेलर पाहिलात का? जाणून घ्या कधी आणि कुठे प्रदर्शित होणार सिनेमा

श्रिया पिळगांवकर - जितेंद्र कुमार यांच्या 'ड्राय डे' चा ट्रेलर पाहिलात का? जाणून घ्या कधी आणि कुठे प्रदर्शित होणार सिनेमा

'ड्राय डे' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. 'पंचायत' वेबसीरिजमधून लोकप्रिय झालेला जितेंद्र कुमार आणि मराठमोळी अभिनेत्री श्रिया पिळगांवकर हे या सिनेमात मुख्य भुमिकेत आहेत. सौरभ शुक्ला यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा कॉमेडी-ड्रामा आहे. ड्राय डे दारूच्या व्यसनावर महत्त्वपूर्ण आणि समर्पक संदेश देतो.

 'ड्राय डे'  सिनेमात जितेंद्र कुमार आणि श्रिया पिळगांवकर पती-पत्नीच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. एम्मे एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली मोनिषा अडवाणी, मधु भगवान आणि निखिल अडवाणी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.  ड्राय डे या सिनेमाचे कथानक देशाचे हृदय मानल्या जाणाऱ्या राज्यातील एका गावात फुलते, विनोद-नाट्यमय कथेत काही काळ गुंडगिरीत असणाऱ्या गन्नू या प्रमुख पात्राचा यंत्रणेविरुद्धचा प्रवास उलगडत जातो.

श्रिया आणि जितेंद्र यांच्यासह या सिनेमात अन्नू कपूरही झळकणार आहेत. चित्रपटातील आपल्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना जितेंद्र कुमार म्हणाला, 'गन्नूचे पात्र साकारताना खूप मजा आली. मी खूप उत्साहित आहे'. तर श्रिया म्हणाली, या सिनेमात काम करण्याचा अनुभव अनेक प्रकारे वेगळा होता.   निर्मला आणि गन्नूचे नाते निर्माण करताना मला खूप आनंद झाला. हा एक असा चित्रपट आहे जो तुम्हाला खळखळून हसेवल आणि तुम्हाला भावूकही करेल'. आता या सिनेमाला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो हे लवकरच कळेल. 

Web Title: trailer of Shriya Pilgaonkar-Jitendra Kumar's 'Dry Day' movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.