प्रभासच्या 'सालार' चित्रपटाचा ट्रेलर या दिवशी येणार भेटीला, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 14:48 IST2023-11-10T14:48:31+5:302023-11-10T14:48:52+5:30
Salaar Movie : बाहुबली फेम प्रभासचे चाहते सालार या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट पुढील महिन्यात २२ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. सालारचा टीझर रिलीज झाला आहे, ज्याला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे.

प्रभासच्या 'सालार' चित्रपटाचा ट्रेलर या दिवशी येणार भेटीला, जाणून घ्या याबद्दल
सुपरस्टार प्रभास(Prabhas)चे चाहते सालार (Salaar Movie) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट पुढील महिन्यात २२ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. सालारचा टीझर रिलीज झाला. या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. आता चाहते सालारच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. यासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. सालारच्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. हे कळल्यानंतर प्रभासच्या चाहत्यांचा उत्साह द्विगुणित होणार आहे.
प्रभासच्या ‘सालार’ या चित्रपटाचा ट्रेलर १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे रणबीर कपूरचा 'अॅनिमल' हा चित्रपट त्याच दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी केले आहे, तर सालारचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. या चित्रपटाचे बजेट २०० कोटी रुपये आहे. प्रभासच्या सालार या चित्रपटाचे ओटीटी हक्क विकले गेले आहेत. या चित्रपटाचे हक्क ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने विकत घेतले आहेत. गेट्स सिनेमाच्या वृत्तानुसार, सालारचे ओटीटी राइट्स १६० कोटी रुपयांना विकले गेले आहेत.
सालार या चित्रपटाचे दिग्दर्शन केजीएफ फेम प्रशांत नीलने केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रभास आणि प्रशांत नील पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. होंबळे फिल्म्स निर्मित, सालार: भाग १ सीझफायर चित्रपटात प्रभास, श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपती बाबू मुख्य भूमिकेत आहेत. हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत हा चित्रपट २२ डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.