20 आॅक्टोबरला येणार ‘दंगल’चे ट्रेलर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2016 15:42 IST2016-10-18T21:49:46+5:302016-10-19T15:42:02+5:30
अजय देवगनचा ‘शिवाय’ व करण जोहरचा ‘ऐ दिल है मुश्किल’ची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच प्रेक्षकांना आमिर खानच्या बहुप्रतिक्षीत ‘दंगल’ ...

20 आॅक्टोबरला येणार ‘दंगल’चे ट्रेलर
‘‘खून पसिना एक होगा, दो दिन मे शुरू होंगा दंगल, इस दंगलवार रहीये तयार, दंगल ट्रेलर आऊट आॅन 20 आॅक्टोबर’’ असे टिष्ट्वट करण्यात आले आहे. या टिष्ट्वटसोबतच ‘दंगल’चे पोस्टरही जारी करण्यात आलेय.
Khoon paseena ek hoga, do din mein shuru hoga Dangal. Iss #Dangalvaar rahiyo taiyaar! #DangalTrailer out on 20th Oct! pic.twitter.com/M0dBcM4Qev— UTV Motion Pictures (@utvfilms) October 18, 2016}}}} ">http://
}}}} ">Khoon paseena ek hoga, do din mein shuru hoga Dangal. Iss #Dangalvaar rahiyo taiyaar! #DangalTrailer out on 20th Oct! pic.twitter.com/M0dBcM4Qev— UTV Motion Pictures (@utvfilms) October 18, 2016
Khoon paseena ek hoga, do din mein shuru hoga Dangal. Iss #Dangalvaar rahiyo taiyaar! #DangalTrailer out on 20th Oct! pic.twitter.com/M0dBcM4Qev— UTV Motion Pictures (@utvfilms) October 18, 2016
पहेलवान महावीर सिंग फोगट यांच्या जीवनावर आधारित असलेल्या‘दंगल’ या चित्रपटात आमिर खान प्रमुख भूमिका साकारतोय. या चित्रपटासाठी आमिरने बरीच मेहनत घेतली असून पिळदार शरीरष्टी असलेल्या पहेलवानापासून ते उतरावयात वजन वाढविलेल्या रूपात तो दिसणार आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘दंगल’ या चित्रपटमध्ये महावीर फोगटच्या भूमिकेतील आमिर आपल्या मुलींना कुस्तीचे धडे देताना दिसेल. या चित्रपटात साक्षी तन्वर, सन्या मल्होत्रा व फातीमा सना शेख यांच्या भूमिका आहेत.
शाहरुख खानचा ‘रईस’, आमिर खानचा ‘दंगल’ व हृतिक रोशनचा ‘काबिल’ या तिन्ही चित्रपटाचे ट्रेलर दिवाळीदरम्यान आऊट होणार, असे मानले जात होते. यात कोण बाजी मारेल यावर चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र सर्व चर्चांना विराम देत आमिरने बाजी मारली आहे.