अंगावर शहारे आणणारा ‘बादशाहो’चा ट्रेलर ! एकदा पाहाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 10:46 IST2017-08-08T05:16:19+5:302017-08-08T10:46:19+5:30
‘बादशाहो’चा ट्रेलर पाहून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. दिग्दर्शक मिलन लुथरिया यांनी कदाचित चित्रपटात सगळ्या प्रकारचा मसाला टाकलाय. जबरदस्त अॅक्शन, दमदार डायलॉग्स, राजकारणपासून तर एका नोकराचा प्रामाणिकपणा, रोमान्स असे सगळेच. ट्रेलरमध्ये याची झलक तुम्ही पाहू शकता.

अंगावर शहारे आणणारा ‘बादशाहो’चा ट्रेलर ! एकदा पाहाच!
‘ ादशाहो’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. अलीकडे या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला होता. हा टीजर पाहून या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार, असेच अनेकांना वाटले होते. अजय देवगण, इमरान हाश्मी व विद्युत जामवाल सारखी तगडी स्टारकास्ट असल्यानंतर अशी अपेक्षा करणे गैर नाहीच. पण तरिही आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, या चित्रपटात केवळ अॅक्शनच नाही तर राजकारण आणि मानवी संवेदना असे सगळे आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हाला त्याची कल्पना येईल.
‘बादशाहो’चा ट्रेलर पाहून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. दिग्दर्शक मिलन लुथरिया यांनी कदाचित चित्रपटात सगळ्या प्रकारचा मसाला टाकलाय. जबरदस्त अॅक्शन, दमदार डायलॉग्स, राजकारणपासून तर एका नोकराचा प्रामाणिकपणा, रोमान्स असे सगळेच. ट्रेलरमध्ये याची झलक तुम्ही पाहू शकता. ट्रेलर पाहून आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. ती म्हणजे, यात केवळ अजय देवगण आणि इमरान हाश्मी हे दोघेच लीड रोलमध्ये नाहीत, तर चित्रपटातील प्रत्येक कलाकाराना तेवढेच महत्त्व देण्यात आले आहे. मग ती इलियाना डिक्रूज असो, इशा गुप्ता असो वा संजय मिश्रा किंवा विद्युत जामवाल. प्रत्येकाला त्यांचा परफॉर्मन्स दाखवण्याची संधी दिली गेली आहे. आता केवळ यापैकी कुठला कलाकार सर्वाधिक टाळ्या घेतो, हेच तेवढे बघायचेयं.
ALSO READ : ‘बादशाहो’च्या स्टारकास्टने केला ५ हजार किमी.चा प्रवास!
‘बादशाहो’ची कथा १९७५ च्या आणीबाणी पार्श्वभूमीवर रेखाटली गेली आहे. याकाळात भारतातील सोने एका गावातून दुसºया गावात नेले जात असताना काही लोक हे सोने लुटण्याचा कट रचतात, अशी ही कथा आहे. एका मुलाखतीदरम्यान मिलन लुथरिया यांना ‘बादशाहो’च्या चित्रपटाची कथा कशी सुचली, यामागेही एक सुरस कथा आहे. १९९९ मध्ये राजस्थानात ‘कच्चे धागे’चे शूटींग सुुरू असताना मिलन यांना ही कथा ‘क्लिक’ झाली होती. या चित्रपटातही अजय देवगण लीड रोलमध्ये होता. म्हणजेच २० वर्षांपूर्वी ‘क्लिक’ झालेली कथा ‘बादशाहो’च्या निमित्ताने आपल्याला पडद्यावर पाहायला मिळणार आहे.