टॉप बिनधास्त बॉलिवूड अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2016 19:37 IST2016-11-18T19:37:39+5:302016-11-18T19:37:39+5:30

बॉलिवूड म्हणजे बिनधास्तपणा. तुम्ही अधिक सोज्वळ राहण्याचा प्रयत्न कराल तर अडगळीत पडाल, जणू अशी स्थिती आहे. बॉलिवूडमध्ये टिकून राहायचे ...

Top Binded Bollywood Actress | टॉप बिनधास्त बॉलिवूड अभिनेत्री

टॉप बिनधास्त बॉलिवूड अभिनेत्री

लिवूड म्हणजे बिनधास्तपणा. तुम्ही अधिक सोज्वळ राहण्याचा प्रयत्न कराल तर अडगळीत पडाल, जणू अशी स्थिती आहे. बॉलिवूडमध्ये टिकून राहायचे असेल तर ‘बेफिक्रे’ असणे म्हत्त्वाचे आहे. त्यामुळे सध्याच्या काळात अनेक अभिनेत्री बोल्ड आणि हॉट फोटोज, दृष्ये देताना जराही मागेपुढे पाहत नाहीत. चित्रपटाच्या कथानकाची गरज आहे, असे सांगून अनेक जण असे हॉट सीन्स देतात. अबला नारीपासून ते आजच्या बिंदास नारीपर्यंतच्या या प्रवासात कोणत्या अभिनेत्री अधिक बिनधास्त आहेत, त्याची ही माहिती.
प्रियंका चोप्रा


बॉलिवूडमध्ये टॉपवर असणारी प्रियंका चोप्रा आणि हॉलिवूडमध्येही काम करते आहे. त्यामुळे तिचा बोल्डनेस सध्या सर्वत्र गाजतो आहे. तिला जगातील सर्वात सेक्सी आशियाई महिला म्हणूनही गौरविण्यात आले आहे. अनेक चित्रपटातून प्रियंकाने आकर्षक भूमिका केल्या आहेत. त्यामुळे सध्या चर्चेतील अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिले जाते.
दीपिका पादुकोण


ट्रिपल एक्स: रिटर्न आॅफ झेंडर केज या हॉलिवूड चित्रपटामुळे आंतरराष्टÑीय ख्यातीप्राप्त झालेली दीपिका पादुकोण ही बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या अनेक चित्रपटातून ती ग्लॅमरस गर्ल म्हणून पुढे आली आहे. 
कॅटरिना कैफ


कॅटरिना कैफ ही सुरुवातीपासूनच बेबी डॉल म्हणून ओळखली जाते. तिच्यातील आकर्षकपणा अनेक चित्रपटातून समोर आला आहे. ‘चिकनी चमेली’सारख्या गाण्याने तिने सर्वांचेच लक्ष्य वेधून घेतले. 
अनुष्का शर्मा



आपल्या अभिनयासोबतच विराट कोहलीसोबतच्या प्रेमसंबंधामुळे अनुष्का नेहमीच चर्चेत राहिली आहे. मात्र तिचा बिनधास्तपणा आजही अनेक चित्रपटातून दिसून येतो. आपल्या कामाप्रति असलेला तिचा उत्साह हा नेहमीच पाहण्याजोगा असतो.
आलिया भट्ट



अभिनेत्री आलिया भट्टच्या रक्तातच बंडखोरपणा आहे. स्टुडंट आॅफ द इअरपासून तिच्या चित्रपट कारकीर्दीला वळण मिळाले. अनेक चित्रपटातून तिने बोल्ड भूमिकाही निभावल्या आहेत. आजच्या काळातील ती आकर्षक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
जॅकलिन फर्नांडिस


श्रीलंकन गर्ल जॅकलिन फर्नांडिस ही बिनधास्त हिरोईन म्हणून सर्वांच्या ओळखीची आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटातून तिची सेक्सी इमेज समोर आली आहे. जॅकलिनने आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ केले आहे.
सनी लिओनी


चित्रपटात येण्यापूर्वीच सेक्सी म्हणून ओळख असलेल्या सनी लिओनीने बॉलिवूडमधील आपले पदार्पण धुमधडाक्यात केले. तिच्याकडे सेक्स सिम्बॉल म्हणून पाहिले जात असल्याने साहजिकच तिच्या वाटेलाही तशाच भूमिका आल्या.

 

Web Title: Top Binded Bollywood Actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.