Top 10 : ...या आहेत बॉलिवूडच्या कोट्यधीश अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2017 14:44 IST2017-04-21T09:14:48+5:302017-04-21T14:44:48+5:30
एक काळ असा होता की, कमाईच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्री अभिनेत्यांच्या तुलनेत कुठेच नसायचे. मात्र ‘जमाना बदल गया है’, आता ...

Top 10 : ...या आहेत बॉलिवूडच्या कोट्यधीश अभिनेत्री
ऐश्वर्या राय-बच्चन
१९९४ मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकलेली अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनचा आजही बॉलिवूडवर दबदबा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार ऐश्वर्याची सुमारे ३५ मिलियन डॉलरची प्रॉपर्टी आहे. ती आजही चित्रपटात अॅक्टिव्ह असल्याने भविष्यात तिची प्रॉपर्टी किती असू शकेल याचा अंदाज बांधणे अवघडच म्हणावे लागेल.
माधुरी दीक्षित
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिने १९८४ मध्ये ‘अबोध’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. ती गेल्या ३३ वर्षांपासून बॉलिवूडमध्ये योगदान देत आहे. तिच्या नावे सुमारे ३५ मिलियन डॉलरची प्रॉपर्टी आहे.
अमिषा पटेल
‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणारी अभिनेत्री अमिषा पटेल भलेही सध्या चित्रपटांमध्ये अॅक्टिव्ह नसली तरी, तिच्या नावे कोट्यवधी रूपांची प्रॉपर्टी आहे. रिपोटर््सनुसार अमिषा ३० मिलियन डॉलर एवढ्या रक्कमेच्या प्रॉपर्टीची मालकीण आहे.
प्रिती झिंटा
सध्या संसारात व्यस्त असलेली अभिनेत्री प्रिती झिंटा एकेकाळी बॉलिवूडमध्ये टॉपची अभिनेत्री होती. त्यामुळे तिच्या नावावर किती प्रॉपर्टी असेल याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. आयपीएलमध्ये एका संघाची मालकीण असलेल्या प्रितीच्या नावे ३० मिलियन डॉलर एवढ्या किमतीची संपत्ती आहे.
दीपिका पादुकोण
बॉलिवूडची मस्ताणी दीपिका पादुकोण सध्या नंंबर एकची अभिनेत्री आहे. त्यामुळे एका चित्रपटासाठी तिचे मानधनही कोटीमध्येच असते. बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही नशीब अजमावणाºया दीपिकाकडे तब्बल २० मिलियन डॉलरची प्रॉपर्टी आहे.
अमृता राव
बॉलिवूडमध्ये सध्या गायब असलेली अभिनेत्री अमृता राव हिने २००२ मध्ये बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. मात्र अल्पावधितच तिने यशाचे अनेक शिखरे पादाक्रांत केली. त्यामुळे अमृता सध्या २० मिलियन डॉलरची मालकीण आहे.
काजोल
आपल्या जमान्यात टॉपची अभिनेत्री राहिलेली काजोल, हीदेखील श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत आहे. सध्या काजोल चित्रपटात जरी अॅक्टिव्ह नसली तरी, तिच्या प्रॉडक्शन कंपनीच्या माध्यमातून ती इंडस्ट्रीमध्ये अॅक्टिव्ह आहे. तिच्या नावे १८ मिलियन डॉलरची संपत्ती आहे.
इलियाना डिक्रूज
अनेक तेलगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखविणारी अभिनेत्री इलियाना डिक्रूज कोट्यधीश रुपयांची मालकीन आहे. तिच्या नावे जवळपास १४ मिलियन डॉलरची संपत्ती आहे.
करिष्मा कपूर
अभिनेत्री करिष्मा कपूरही एकेकाळी टॉपची अभिनेत्रींमध्ये होती. त्यामुळे ती चित्रपटासाठी कमालीचे मानधन घेत आहे. करिष्माने पती संजय कपूर याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर पुन्हा ती चित्रपटांमध्ये अॅक्टिव्ह होण्याची तयारी करीत आहे. दरम्यान, करिष्मा सुपारे १२ मिलियन डॉलर एवढ्या रक्कमेच्या संपत्तीची मालकीण आहे.
मल्लिका शेरावत
हॉट आणि सेक्सी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणारी मल्लिका शेरावत गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमधून गायब आहे. मल्लिकाला तिच्या बोल्डनेससाठी ओळखले जात असून, लवकरच ती पुन्हा इंडस्ट्रीमध्ये परतण्याची शक्यता आहे. शिवाय आंतरराष्टÑीय स्तरावरही तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मल्लिका सुमारे १० मिलियन डॉलरची मालकीण आहे.