खूप सा-या मुलांची आई व्हायचेय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 18:43 IST2016-07-30T13:13:54+5:302016-07-30T18:43:54+5:30
बॉलिवूड आणि हॉलिवूड अशा दोन्ही ठिकाणी जिच्या अभिनयाचा डंका वाजतोय त्या आपल्या लाडक्या पीसीने अर्थात प्रियांका चोप्राने आपल्या मनातील ...
.jpg)
खूप सा-या मुलांची आई व्हायचेय!
ब लिवूड आणि हॉलिवूड अशा दोन्ही ठिकाणी जिच्या अभिनयाचा डंका वाजतोय त्या आपल्या लाडक्या पीसीने अर्थात प्रियांका चोप्राने आपल्या मनातील एक गुपित अलिकडे उघड केले. मी माझ्या करिअरच्याबाबतीत खूप अलर्ट आहे हे खरे असले तरी मी मुलांच्याबाबतीत अजिबात तडजोड करणार नाही. मला खूप सा-या मुलांची आई व्हायचेय, असे तिने जाहीरपणे सांगितले. मी माझे आयुष्य माझ्या अटीवर जगत आली आहे. कुठलीही चौकट मला मान्य नाही. म्हणूनच मी असा कुठलाही शो स्वीकारत नाही जिथे माझ्या प्रतिभेच्या सादरीकरणाला वाव नसतो. मी मुळात भारतीय आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठेही काम करीत असले तरी माझे राष्ट्रीयत्व माज्या कामातून झळकले पाहिजे, हाच माझा प्रयत्न असतो, असे प्रियांका म्हणाली. व्वा प्रियांका, मुलांबद्दलचे तुझे प्रेम आम्हाला कळले. पण, त्यासाठी तुला तुझा मिस्टर राईट कधी मिळणार आहे, याचाही खुलासा करशील तर बरे होईल...