‘अब भीड के सामने पेशाब नहीं करेगा टॉमी सिंह’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2016 18:11 IST2016-06-13T12:41:57+5:302016-06-13T18:11:57+5:30
‘अब भीड के सामने पेशाब नहीं करेगा टॉमी सिंह’..होय, ‘उडता पंजाब’मधील टॉमी सिंह(ही भूमिका शाहीद कपूरने साकारलीयं) आता लोकांसमोर ...

‘अब भीड के सामने पेशाब नहीं करेगा टॉमी सिंह’
‘ ब भीड के सामने पेशाब नहीं करेगा टॉमी सिंह’..होय, ‘उडता पंजाब’मधील टॉमी सिंह(ही भूमिका शाहीद कपूरने साकारलीयं) आता लोकांसमोर मूत्रविसर्जन अर्थात शू शू करताना दिसणार नाही. स्टेज शो करताना शाहीद कपूर लोकांसमोर शू शू करतांनाचा सीन चित्रपटात होता.केवळ हा एक सीन ‘उडता पंजाब’मधून कट होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हा एक सीन कट करून चित्रपटाच्या रिलीजला मुभा दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय ‘उडता पंजाब’ टीमसाठी सगळ्यात मोठा विजय म्हणता येईल. कारण सेन्सॉर बोर्डाने ‘उडता पंजाब’च्या निर्मात्यांना ८९ दृश्यांवर कात्री चालवण्याचे आदेश दिले होते. ‘उडता पंजाब’च्या निर्मात्यांनी या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर निर्णय देत, न्यायालयाने केवळ एकच सीन चित्रपटातून वगळण्याचे आदेश दिले. रचनात्मक स्वातंत्र्यावर निर्बंध येता कामा नये, असे सांगत चित्रपटात या एका दृश्याव्यतिरिक्त पंजाबची प्रतीमा मलीन करणारे वा देशाचे सार्वेभौमत्व धोक्यात आणणारे काहीच नसल्याचे न्यायालयाने म्हटले.
![]()