इसबार संग्राम भालेराव, जो देतो त्रास, त्याचा मी घेतो क्लास...!‘सिम्बा’चे शूटींग सुरु!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 18:01 IST2018-06-06T12:31:49+5:302018-06-06T18:01:49+5:30
रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मित ‘सिम्बा’ या चित्रपटाचे शूटींग आजपासून सुरू झाले. ‘सिंघम’ सारखा सुपरहिट चित्रपट देणा-या ...
.jpg)
इसबार संग्राम भालेराव, जो देतो त्रास, त्याचा मी घेतो क्लास...!‘सिम्बा’चे शूटींग सुरु!!
र हित शेट्टी दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मित ‘सिम्बा’ या चित्रपटाचे शूटींग आजपासून सुरू झाले. ‘सिंघम’ सारखा सुपरहिट चित्रपट देणा-या रोहित शेट्टीच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. हा चित्रपटही ‘सिंघम’सारख्याच एका पोलिस अधिका-याची कथा आहे. पण ‘सिम्बा’ हा ‘सिंघम’पेक्षा अगदी वेगळा असणार आहे. रणवीर कपूर आणि सारा अली खान हे या चित्रपटाचे लीड स्टार्स शूटींगसाठी हैदराबादला पोहोचले आणि शूटींगचा श्रीगणेशा झाला. पहिल्या दिवशीचा सेटवरचा फोटो आणि व्हिडिओ रोहितने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोत रोहित शेट्टी, रणवीर सिंग, सारा अली खान व करण जोहर असे सगळे आहेत. व्हिडिओत सारा आणि रणवीर दोघेही मराठी बोलताना दिसताहेत.
रणवीर व साराचा मराठमोळा अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा
हैदराबादेतील रामोजी फिल्म सिटीत या चित्रपटाच्या शूटींगचे फर्स्ट शेड्यूल पूर्ण होणार आहे. ‘सिम्बा’चे स्टार्ट टू फिनिश शेड्यूल दोन महिने चालणार आहे. ताजी बातमी खरी मानाल तर या अॅक्शन व कॉमेडीची धमाल असलेल्या चित्रपटात अजय देवगण पाहुण्या भूमिकेत दिसेल.
रोहित शेट्टी यांचा ‘सिम्बा’ या चित्रपटात रणवीर सिंग पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘सिम्बा’हा सिनेमा तेलगू चित्रपट ‘टेंपर’चा रिमेक आहे. पण रोहित शेट्टीचे मानाल तर हा पूर्णपणे ‘टेपर’चा रिमेक नसेल. केवळ २० टक्के भाग ‘टेंपर’मधून घेतला जाईल. उर्वरित चित्रपट बॉलिवूड प्रेक्षकांना डोळ्यांपुढे ठेवून बनवला जाईल.
ALSO READ : अखेर संकट टळले! सारा अली खानने सोडला सुटकेचा निश्वास!!
‘पद्यावत’नंतर लगेच रणवीर ‘गली बॉय’ या चित्रपटात व्यस्त झाला. ‘गली बॉय’चे शूटींग संपल्यावर रणवीरने एक छोटाशा बे्रक घेतला. याकाळात त्याने स्वित्झर्लंडमध्ये सुट्टया घालवल्या आणि सुट्टीवरून परतताच रणवीर ‘सिम्बा’च्या शूटींगवर हजर झाला. रणवीरने या चित्रपटासाठी खास मिशी ठेवली आहे.