टायगरच्या बहिणीने बॉयफ्रेंडसोबत शेअर केला फोटो, बोल्डनेसमध्ये अभिनेत्रींना टाकले मागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 18:53 IST2019-12-31T18:46:51+5:302019-12-31T18:53:38+5:30
कृष्णाने बॉयफ्रेंडसोबतचा आणखी एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

टायगरच्या बहिणीने बॉयफ्रेंडसोबत शेअर केला फोटो, बोल्डनेसमध्ये अभिनेत्रींना टाकले मागे
टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ सध्या तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून कृष्णा श्रॉफ साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर नजर टाकली तरी तिचे बॉयफ्रेंडसह अनेक रोमँटिक फोटो आपल्याला पाहायला मिळतात. लग्नाआधीच हे दोघे व्हॅकेशन एन्जॉय करत असल्याचे या फोटोंमधून पाहायला मिळते. सतत ते दोघांचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात आणि हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील होतात.
आता कृष्णाने बॉयफ्रेंडसोबतचा आणखी एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून या फोटोवर चक्क तिचा भाऊ टायगर श्रॉफने कमेंट केले आहे. कृष्णाने पोस्ट केलेल्या या फोटोत तिने बिकनी घातली असून तिचा हॉट अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. हा फोटो पोस्ट करत कृष्णाने लिहिले आहे की, तू मला नेहमीच खळखळून हसवतो. माझ्या बेस्ट फ्रेंडसोबत या वर्षांत माझी ओळख झाली. हे वर्षं माझ्यासाठी खूपच छान होते.
कृष्णाच्या या पोस्टवर तिचा भाऊ टायगर श्रॉफने लिहिले आहे की, बिचारा इबान... त्याच्या या रिप्लायवर त्याचे अनेक चाहते प्रतिक्रिया नोंदवत आहेत.
काही महिन्यांआधीच कृष्णाने तिचा टॉपलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. त्यानंतर तिने तिच्या हॉट फोटोंचा सपाटाच लावला. आता तर ती नेहमीच तिचे बोल्ड फोटो पोस्ट करत असते. कृष्णाचा सेक्सी अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. एकंदरीतच काय तर सध्या चंदेरी दुनियेच्या झगमगाटापासून दूर राहिलेल्या कृष्णाचा रूपेरी पडद्यावर नसला तरी सोशल मीडियावर बोलबाला आहे हे मात्र नक्की.