टायगर श्रॉफच्या २आगामी चित्रपटाचे शूटिंग झाले बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 10:10 IST2017-10-19T04:40:57+5:302017-10-19T10:10:57+5:30

टायगर श्रॉफ नवीन पिढीचा सुपरस्टार आहे ह्यात काही शंकाच नाही. त्याच्या पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला त्यानंतर त्याचे ...

Tiger Shroff's upcoming movie was shot | टायगर श्रॉफच्या २आगामी चित्रपटाचे शूटिंग झाले बंद

टायगर श्रॉफच्या २आगामी चित्रपटाचे शूटिंग झाले बंद

यगर श्रॉफ नवीन पिढीचा सुपरस्टार आहे ह्यात काही शंकाच नाही. त्याच्या पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला त्यानंतर त्याचे चित्रपट फारसे काही कमाल करू शकले नाही तरीपण टायगर श्रॉफ च्या लोकप्रियतेत काही कमी झाली नाही त्याचे फॅन फॉलोईंग वाढतच गेले. सध्या येत असलेल्या बातमीनुसार टायगर चे दोन आगामी चित्रपट रखडले आहेत. रॅम्बो आपल्या लक्षात असेलच की हा चित्रपट मोठ्या थाटामटाने जाहीर करण्यात आला होता, टायगरचा हातात पिस्तुल घेतलेलं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते पण लगेचच असे जाहीर करण्यात आले की हा चित्रपट काही कारणास्तव थांबवण्यात आला आहे. तर दुसरा चित्रपट स्टुडंट ऑफ द इअर. काही दिवसांपूर्वी धर्मा प्रॉडक्शनने जाहीर केले होते की स्टुडंट ऑफ द इअरचा दुसरा भाग ते टायगर श्रॉफला घेऊन तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर पहिल्या भागातील स्टुडंट ऑफ द इअरचे स्टार असलेल्या वरूण धवन आणि आलिया भट्टने टायगलाचे याबद्दल अभिनंदनदेखील केले होते. आता असे ऐकण्यात येत आहे की धर्मा प्रॉडकशन हा चित्रपट तयार करत नाही. ह्याचे कारण असे सांगितले जात आहे की करण जोहरला स्टुडंट ऑफ द इअरसाठी जशी स्क्रिप्ट हवी आहे तशी मिळत नाही आहे. त्यामुळे करण जोहर सध्या स्टुडंट ऑफ द इअर २ बनवू इच्छित नाही. 

टायगर श्रॉफ च्या फॅन्स ला निराश व्हायचे कारण नाही, टायगर सध्या बागी २च्या शूट मध्ये व्यस्त आहे आणि त्यानंतर टायगर श्रॉफ हृतिक रोशन बरोबर आपल्या नवीन चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करणार आहे. आता हीच अपेक्षा आहे की टायगर श्रॉफ त्याच्या ह्या दोन आगामी चित्रपटात  त्याचे दोन बंद पडलेले चित्रपटाची कमी भरून काढेल.

Web Title: Tiger Shroff's upcoming movie was shot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.