टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पाटनीला म्हटले ‘वेश्या’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 21:29 IST2017-02-24T15:59:19+5:302017-02-24T21:29:19+5:30
गेल्या महिन्यात पार पडलेला ‘फिल्म फेअर अवॉर्ड सोहळा’ जेवढा पुरस्कारांवरून गाजला नसेल तेवढा टायगर श्रॉफची गर्लफें्रड दिशा पाटनी हिने ...

टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पाटनीला म्हटले ‘वेश्या’
ग ल्या महिन्यात पार पडलेला ‘फिल्म फेअर अवॉर्ड सोहळा’ जेवढा पुरस्कारांवरून गाजला नसेल तेवढा टायगर श्रॉफची गर्लफें्रड दिशा पाटनी हिने परिधान केलेल्या ड्रेसवरून गाजत आहे. कारण या ड्रेसमध्ये दिशाचा लुक असा काही होता की, सोहळ्यातच एक व्यक्ती तिच्या या लुकवर अक्षरश: लट्टू झाला होता. तो सारखा तिच्या छातीकडे बघत होता. याचे काही फोटोही सध्या व्हायरल झाले आहेत. मात्र खरी गंमत तेव्हा आली जेव्हा दिशाने याच ड्रेसमधील एक फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला. कारण तिच्या या फोटोला कमेण्ट देताना एका नेटिझन्सने चक्क तिला ‘वेश्या’ म्हणून संबोधले.
![]()
निकोलस जिब्रान यांनी डिझाइन केलेल्या या ड्रेसमध्ये दिशा जबरदस्त हॉट दिसत होती. तिने याच ड्रेसमधला एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. मात्र नेटिझन्सने तिच्या या फोटोला खूपच गलिच्छ कमेण्ट दिले. त्यातील एका यूजर्सने तर तिला चक्क ‘वेश्या’ असे म्हटले. ‘तू या ड्रेसमध्ये वेश्यासारखी दिसत आहेस. आम्हाला माहीत आहे की तू ब्रेस्ट इंप्लांट्स केले आहे, मग लोकांना का बरं दाखवित फिरत आहेस’ यूजर्सची ही कमेण्ट वाचून मात्र दिशाचा चांगलाच पारा चढला तिनेही त्याला जशास् तसे उत्तर दिले.
दिशाने म्हटले की, बलात्कार आणि छेडछाडीच्या घटना मी नियमित ऐकत आली आहे. आपल्या देशात स्त्रीला देवीचा दर्जा दिला जातो. त्यामुळे तुला लाज वाटायला हवी. एखाद्या महिलेला तिच्या कपड्यांवरून जज करणे सोपे असते, मात्र तुझ्यासारखे लोक गलिच्छ मेंटॅलिटीचे लोकच अशाप्रकारचा विचार करतात. इतरांना चांगले कपडे घालण्याचा सल्ला देण्यापेक्षा तुम्हीच का त्या जागेवर बघणे बंद करीत नाहीत’ अशा शब्दात दिशाने त्या यूजर्सची खरडपट्टी काढली.
![]()
सध्या दिशाच्या या ड्रेसवरून जबरदस्त वादंग निर्माण होत आहे. सोहळ्यात एक व्यक्ती तिच्या छातीकडे बघत असल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता यूजर्स प्रकरणही समोर आल्याने दिशाला याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र टायगर श्रॉफकडून अद्यापपर्यंत या प्रकरणावर कुठल्याही प्रकारचे वक्तव्य आले नाही. त्यामुळे टायगर यावर काही बोलणार की दिशालाच हे संपूर्ण प्रकरण हाताळावे लागणार हे बघणे मजेशीर ठरेल.