टायगर श्रॉफचा 'बागी ४' अखेर ओटीटीवर आला, कुठे पाहाल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 09:13 IST2025-10-17T09:08:25+5:302025-10-17T09:13:22+5:30
आज, १७ ऑक्टोबर २०२५ पासून हा चित्रपट चाहते घरबसल्या पाहू शकतील.

टायगर श्रॉफचा 'बागी ४' अखेर ओटीटीवर आला, कुठे पाहाल?
Baaghi 4 OTT Release Date: टायगर श्रॉफच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही 'बागी ४' थिएटरमध्ये पाहिला नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. थिएटरनंतर आता बहुप्रतिक्षित ॲक्शनपट 'बागी ४' अखेर ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल झाला आहे. थिएटर रिलीजच्या सुमारे दीड महिन्यानंतर, आज, १७ ऑक्टोबर २०२५ पासून हा चित्रपट चाहते घरबसल्या पाहू शकतील.
टायगर श्रॉफचा हा ॲक्शन-पॅक्ड चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video) वर स्ट्रीम झाला आहे. पण, यात एक ट्विस्ट आहे. हा चित्रपट तुम्हाला मोफत नाही, तर रेंटवर घेऊन पाहावा लागेल. साजिद नाडियाडवाला यांच्या यशस्वी 'बागी' फ्रँचायझीमधील मागील चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळालाय. टायगर श्रॉफचा 'बागी ४' हा ५ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधू, सोनम बाजवा आणि अभिनेता संजय दत्तनं महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. श्रेयस तळपदेनेही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली.
काय आहे सिनेमाची कथा?
'बागी ४' मध्ये टायगर श्रॉफ रॉनीच्या भूमिकेत आहे. एका घातक ट्रेन अपघातातून तो कसा वाचतो, हे यात दाखवण्यात आलं आहे. जिच्यावर त्यानं प्रेम केलं, तिच्या आठवणींनी तो ग्रासलेला आहे. सिनेमाच्या बजेटबद्दल बोलायचं झालं तर, तब्बल ८० कोटी रुपये बजेटमध्ये सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमाची कमाई ४३ कोटींच्या जवळपास झाली आहे.