या अभिनेत्रीची किक बघून टायगर श्रॉफची अ‍ॅक्शन विसरून जाल, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2018 18:09 IST2018-05-26T12:39:48+5:302018-05-26T18:09:54+5:30

सध्या देशभरात फिटनेस कॅम्पेन सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून या अभिनेत्रीने एक जबरदस्त व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये ती किक मारताना दिसत आहे.

Tiger Shroff's action is forgotten by watching this actress's kick, see video! | या अभिनेत्रीची किक बघून टायगर श्रॉफची अ‍ॅक्शन विसरून जाल, पाहा व्हिडीओ!

या अभिनेत्रीची किक बघून टायगर श्रॉफची अ‍ॅक्शन विसरून जाल, पाहा व्हिडीओ!

शल मीडियावर सध्या ‘हम फिट तो इंडिया फिट’ या नावाने एक कॅम्पेन सुरू असून, त्यामध्ये बॉलिवूड कलाकारांसह क्रिकेट आणि राजकारणातील दिग्गज एक्सरसाइज करतानाचे व्हिडीओ पोस्ट करीत आहेत. या व्हिडीओमध्ये फिट राहण्यासाठी ते करीत असलेली एक्सरसाइज दाखविण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत. आता या कॅम्पेनमध्ये अभिनेत्री नितू चंद्रा हिचेही नाव जोडले गेले असून, तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती जबरदस्त किक मारताना दिसत आहे. तिची ही किक बघून तुम्ही अभिनेता टायगर श्रॉफची अ‍ॅक्शन विसरून जाल असेच काहीसे म्हणावे लागेल. तिच्या या व्हिडीओच्या चाहत्यांकडून जोरदार कौतुक केले जात आहे. 

नितू चंद्रा तायक्वांदोमध्ये ब्लॅक ब्लेट आहे. १९९७ मध्ये हॉँगकॉँग येथे आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या व्हिडीओमध्ये नितू चंद्रा आपल्या ट्रेनरसोबत जीममध्ये आहे आणि तायक्वांदोचे काही कसरती करून दाखवित आहे. त्यातील एक कसरत थक्क करणारी आहे. होय, तिने एकावेळाला आपल्या ट्रेनरच्या डोक्यावरून दहा किक मारल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. तिच्या या हटके अंदाजावर चाहते फिदा झाले असून, तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत. काही यूजर्सनी तिला बिहारचा गर्व असे म्हटले तर काहींनी तिला बॉडी टोनचा सल्ला दिला. 
 

दरम्यान, नितू चंद्राने तेलगू आणि तामिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे. सध्या ती दूरदर्शनवरील रंगोली या शोमध्ये बघावयास मिळते. दरम्यान, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राजवर्धन सिंग राठोड यांनी त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करून फिटनेस चॅलेंजला सुरुवात केली. त्यांनी पुशअप मारतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर अनेकांनी हे चॅलेंज स्वीकारून वर्कआउट करतानाचे व्हिडीओ अपलोड केले. सध्या देशभरात हे कॅम्पेन सोशल मीडियावर चांगलेच हिट होताना दिसत आहे. 

Web Title: Tiger Shroff's action is forgotten by watching this actress's kick, see video!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.