टायगर श्रॉफ-सुनिधी चौहानच्या दिलखेचक अदांनी जयपूरवासी ‘खल्लास’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:43 IST2016-12-21T12:36:47+5:302016-12-21T16:43:06+5:30
‘पिंक सिटी’ जयपूर.. युवांचा जल्लोष..धम्माल..मस्ती...गर्दी.. अशा बेधुंद वातावरणात सुनिधी चौहानचा मदमस्त-बुलंद आवाज अन् टायगर श्रॉफच्या डान्समुव्ह्ज यांनी जयपूर येथील ...
.jpg)
टायगर श्रॉफ-सुनिधी चौहानच्या दिलखेचक अदांनी जयपूरवासी ‘खल्लास’!
‘ िंक सिटी’ जयपूर.. युवांचा जल्लोष..धम्माल..मस्ती...गर्दी.. अशा बेधुंद वातावरणात सुनिधी चौहानचा मदमस्त-बुलंद आवाज अन् टायगर श्रॉफच्या डान्समुव्ह्ज यांनी जयपूर येथील युथ ‘खल्लास’ झाला. टायगर-सुनिधीचे चाहते हे त्यांची एक झलक पाहावयास उत्सुक झालेले असतानाच दोघांनीही स्टेजवर एन्ट्री केली. सुनिधीचा मखमली आवाज आणि टायगरच्या डान्सस्टाईलने उपस्थितांना अक्षरश: भुरळ घातली. स्टेजवरील फोटो नुकतेच आऊट करण्यात आले आहेत. पाहुुयात त्यांची धम्माल मस्ती फोटोंच्या माध्यमातून...
![]()
![]()
मेरे नाल तू व्हिसिल बजा...
बॉलिवूडचा ‘मायकेल जॅक्सन’ टायगर श्रॉफ याचा डान्स पाहायला कुणाला आवडत नाही. जयपूर येथे आयोजित एका सोहळ्यात टायगर श्रॉफचा डान्स पाहण्याची सर्वांना उत्सुकता लागलेली असतानाच टायगर श्रॉफने ‘मेरे नाल तू व्हिसिल बजा’ या गाण्यासह धमाकेदार एन्ट्री केली. स्टेजसमोर हजारों चाहत्यांची गर्दी कल्लोळ करत होती. टायगरसोबतच्या सपोर्टिंग गर्ल्सने पाहता पाहता संपूर्ण स्टेज व्यापून घेतल्यानंतर त्याने त्याच्या डान्समुव्ह्जने सर्वांना घायाळ केले. त्यानंतर त्याने ‘धीरे धीरे से मेरी जिंदगी मैं आना..’ यावर त्याला संपूर्ण उपस्थितांनी जल्लोष करून पसंती दर्शवली.
![]()
![]()
सुनिधीची एंट्री धमाकेदार...
‘धूम मचा ले, धूम मचा ले...’ या धमाकेदार गाण्यासह गायिका सुनिधी चौहान हिने स्टेजवर एन्ट्री घेतली. जोशपूर्ण आणि चिअर अप करणाऱ्या गर्दीमध्ये तिने एकानंतर एक अनेक बॉलिवूड हिट नंबर्स सादर करून उपस्थित युवापिढीला मोहून टाकले. सुनिधीमधील एनर्जी आणि उत्साह पाहून तिच्या गाण्यांवर सर्वजण मदमस्त होऊन डान्स करू लागले. तिने तिच्यासह संपूर्ण गर्दीलाही गायला आणि नाचायला भाग पाडले.