टायगर श्रॉफ, हे वागणे बरे नव्हे! पाहा, व्हिडिओ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 18:12 IST2018-09-03T18:12:23+5:302018-09-03T18:12:30+5:30

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि त्याची गर्लफ्रेन्ड दिशा पटानी अनेकदा लंच आणि डिनर डेट एन्जॉय करताना दिसलेत. पण यावेळी दोघांनाही भलताच अनुभव आला. 

tiger shroff leaves disha patani alone in crowd | टायगर श्रॉफ, हे वागणे बरे नव्हे! पाहा, व्हिडिओ!!

टायगर श्रॉफ, हे वागणे बरे नव्हे! पाहा, व्हिडिओ!!

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि त्याची गर्लफ्रेन्ड दिशा पटानी अनेकदा लंच आणि डिनर डेट एन्जॉय करताना दिसलेत. पण यावेळी दोघांनाही भलताच अनुभव आला. दिशा तर यादरम्यान अगदी रडकुंडीला आलेली दिसली. त्याचे झाले असे की, दिशा व टायगर मुंबईतील वांद्र्याच्या एका रेस्टॉरंटमध्ये गेलेत. तिथून बाहेर पडताना त्या दोघांनाही गर्दीने असे काही घेरले की, दोघांच्याही चेहऱ्यांचा रंग उडाला. विशेषत: टायगरसोबत सेल्फी घेण्यासाठी लोक अक्षरश: तुटून पडले. याक्षणाला टायगरने जे केले, ते पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या. खरे तर टायगरच्या मागेचं दिशा होती. पण मागे पडलेल्या दिशाला आधार द्यायचे सोडून टायगर एकटाच पुढे गेला. त्याने एकट्याने कशीबशी गर्दीतून सुटका करून घेतली आणि आपल्या कारमध्ये जावून बसला.

 टायगर कारमध्ये जावून बसलेला पाहून बिचारी दिशा गर्दीत आणखीच गोंधळली. ती इतकी घाबरली की, काय करावे तिला सुचेना. अशास्थितीत   हॉटेलचा सुरक्षारक्षक दिशाच्या मदतीला धावून आला आणि त्याने दिशाला कारपर्यंत पोहोचवले. टायगरने अचानक गर्दीत एकटे सोडून जावे, हे कदाचित दिशालाही फार रूचले नसावे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मौनी रॉय हिलाही लोकांनी असेच घेरले होते. गर्दीतून वाट काढताना ती सुद्धा प्रचंड घाबरली होती. त्यापूर्वी जान्हवी कपूरसोबतही असेच काही घडले होते. सुरक्षारक्षक सोबत असतानाही जान्हवीला गर्दी बाहेर पडणे बरेच कठीण गेले होते.

Web Title: tiger shroff leaves disha patani alone in crowd