OMG! दिशा पटनीला सोडून तारा सुतारियासोबत वाढतेय टायगर श्रॉफची जवळीक!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 02:23 PM2018-08-23T14:23:52+5:302018-08-23T14:25:33+5:30

टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी म्हणजे बॉलिवूडच्या हॉट कपलपैकी एक. या हॉट कपलबद्दल रोज नव्या बातम्या आपण ऐकतोच. सध्याही एक अशीच बातमी आहे. पण ही बातमी दिशाला अस्वस्थ करणारी ठरू शकते. 

tiger shroffs closeness with student of the year 2 actress tara sutaria | OMG! दिशा पटनीला सोडून तारा सुतारियासोबत वाढतेय टायगर श्रॉफची जवळीक!!

OMG! दिशा पटनीला सोडून तारा सुतारियासोबत वाढतेय टायगर श्रॉफची जवळीक!!

टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी म्हणजे बॉलिवूडच्या हॉट कपलपैकी एक. या हॉट कपलबद्दल रोज नव्या बातम्या आपण ऐकतोच. सध्याही एक अशीच बातमी आहे. पण ही बातमी दिशाला अस्वस्थ करणारी ठरू शकते. केवळ दिशालाचं नाही ‘स्टुडंट आॅफ  ईअर2’मधून बॉलिवूड डेब्यू करणार असणारी तारा सुतारिया हिचा कथित बॉयफ्रेन्ड रोहन मेहरा यालाही ही बातमी दुखावणारी ठरू शकते. आम्ही काय सांगू इच्छितो, हे तुम्हाला कळले असेलच. होय, ‘स्टुडंट आॅफ ईअर2’मध्ये टायगर आणि तारा दोघेही आहेत आणि शूटींगदरम्यान दोघांचीही जवळीक नको इतकी वाढल्याची चर्चा आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, टायगर आणि तारा दोघेही फोनवरून एकमेकांशी तासन् तास बोलत असतात. काही दिवसांपूर्वी मनीष मल्होत्राच्या पार्टीत तारा व टायगर दोघेही एकत्र दिसले होते. आता या दोघांमध्ये काय खिचडी शिजतेय, ते तर आम्हाला ठाऊक नाही. पण बॉलिवूडमध्ये कधी कुठली जोडी तुटेल आणि कधी कुठली नवी जोडी बनेल, याचा नेम नाही इतके मात्र खरे. टायगर व तारा एकमेकांचे चांगले मित्र असतील, हेही शक्य आहे. पण बी-टाऊनमध्ये दोघांबद्दलही वेगळीच चर्चा आहे.  तारा सुतारिया अभिनेत्री, गायिका आणि डान्सर आहे. तिने क्लासिकल बॅले, मॉडर्न डान्स आणि लॅटिन अमेरिकन डान्सची यूके येथे ट्रेनिंग केली आहे. त्याचबरोबर ‘तारे जमीं पर, गुजारिश आणि डेविड’ यासारख्या चित्रपटांमध्ये तिने डबिंगही केली आहे. ताराने व्हिडीओ जॉकी (व्हीजे) म्हणून डिज्नीमध्येही काम केले आहे. 

स्टुडंट आॅफ द ईअर2’मध्ये टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत आहेत, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया. २०१२ मध्ये ‘स्टुडंट आॅफ द ईअर’ रिलीज झाला होता. तरूणाईने हा चित्रपट चांगलाच डोक्यावर घेतला होता. हा चित्रपट स्वत: करणने दिग्दर्शित केला होता. पण ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’ पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित करतोय. पुनीतने याआधी ‘आय हेट लव्ह स्टोरी’ आणि ‘गोरी तेरे प्यार में’ सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

Web Title: tiger shroffs closeness with student of the year 2 actress tara sutaria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.