दिशा पटानीनंतर आता या व्यक्तीसोबत रिलेशनशीपमध्ये आहे टायगर श्रॉफ, अभिनेत्यानं सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 11:33 AM2023-08-11T11:33:33+5:302023-08-11T11:33:55+5:30

Tiger Shroff : दिशा पटानीसोबत ब्रेकअपच्या एका वर्षानंतर टायगर श्रॉफचे नाव दुसऱ्या व्यक्तीसोबत जोडले जात आहे.

Tiger Shroff is now in a relationship with this person after Disha Patani, actor breaks silence | दिशा पटानीनंतर आता या व्यक्तीसोबत रिलेशनशीपमध्ये आहे टायगर श्रॉफ, अभिनेत्यानं सोडलं मौन

दिशा पटानीनंतर आता या व्यक्तीसोबत रिलेशनशीपमध्ये आहे टायगर श्रॉफ, अभिनेत्यानं सोडलं मौन

googlenewsNext

दिशा पटानी (Disha Patani) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांच्या रिलेशनशीपची खूप चर्चा झाली होती. त्याच वेळी, त्यांच्या ब्रेकअपच्या वृत्तही चर्चेत आले होते. जरी दोघांनीही हे नातं उघडपणे स्वीकारलं नाही. आता ब्रेकअपच्या एका वर्षानंतर टायगरचे नाव दिशासोबत जोडले जाऊ लागले आहे, पण ती दिशा पटानी नसून दिशा धानुका आहे. टायगर श्रॉफ आता दिशा धानुकाला डेट करत असल्याचे वृत्त आहे. आता टायगर श्रॉफने यावर मौन तोडले असून दिशाला डेट करण्याबाबत खुलासा केला आहे.

बॉम्बे टाईम्सच्या रिपोर्टनुसार, टायगर श्रॉफ सध्या दिशा धानुकाला डेट करत आहे. एंटरटेनमेंट पोर्टलचा दावा आहे की ती एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये खूप चांगल्या पदावर काम करते आणि अनेकदा टायगरला योग्य स्क्रिप्ट शोधण्यात मदत करते. पटानीपासून वेगळे झाल्यानंतर टायगरने दिशाला डेट करण्यास सुरुवात केली होती. पोर्टलने स्त्रोताच्या हवाल्याने दावा केला आहे की, “ते जवळपास दीड वर्षांपासून एकमेकांना भेटत आहेत. दिशा अनेकदा त्याला स्क्रिप्टबद्दल सल्ले देते, तसेच तिने त्याच्या फिटनेसचीही काळजी घेते. टायगरच्या कुटुंबालाही दिशा आवडते. प्रत्येकाला त्यांच्या नात्याची जाणीव आहे."

टायगर सध्या आहे सिंगल

याबाबत टायगर श्रॉफला विचारले असता तो म्हणाला की तो सिंगल आहे. ई टाईम्सच्या रिपोर्टनुसार, टायगर म्हणाला, 'काही महिन्यांपूर्वी मला वाटले होते की माझे दुसऱ्याशी नाते आहे, पण नाही, मी गेल्या दोन वर्षांपासून सिंगल आहे.' दरम्यान, दिशा पटानी तिच्या जिम पार्टनरला डेट करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अलीकडेच, सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये दिशा तिच्या मित्राची ओळख अलेक्झांडरला तिचा प्रियकर म्हणून करताना दिसत आहे.

Web Title: Tiger Shroff is now in a relationship with this person after Disha Patani, actor breaks silence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.