अरे देवा! क्रॉप टॉप घालून टायगर श्रॉफचा डान्स, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "मुलींचे कपडे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 12:54 IST2025-05-20T12:54:00+5:302025-05-20T12:54:39+5:30

मुंबईतील एका अवॉर्ड शोमध्ये टायगरने त्याच्या डान्सने चार चांद लावले. मात्र, यावेळी त्याने घातलेल्या कपड्यांमुळे टायगरला ट्रोल केलं जात आहे. 

tiger shroff gets troll for his crop top outfit in award show dance video viral | अरे देवा! क्रॉप टॉप घालून टायगर श्रॉफचा डान्स, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "मुलींचे कपडे..."

अरे देवा! क्रॉप टॉप घालून टायगर श्रॉफचा डान्स, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "मुलींचे कपडे..."

टायगर श्रॉफ त्याच्या अभिनयासोबतच फिटनेस आणि डान्ससाठीही ओळखला जातो. त्याच्या डान्सचे आणि डान्स मुव्ह्सचे लाखो चाहते आहेत. हृतिक रोशननंतर बॉलिवूडमधील दुसरा सुपर डान्सर हिरो म्हणून टायगरकडे पाहिलं जातं. नुकतंच मुंबईतील एका अवॉर्ड शोमध्ये टायगरने त्याच्या डान्सने चार चांद लावले. मात्र, यावेळी त्याने घातलेल्या कपड्यांमुळे टायगरला ट्रोल केलं जात आहे. 

या अवॉर्ड शोमध्ये परफॉर्मन्स करताना टायगरने काळ्या रंगाची पँट आणि क्रॉप टॉप घातल्याचं दिसून आलं. या विचित्र आऊटफिटमुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. टायगरने या अवॉर्ड शोमधील डान्सचे व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. त्याच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. 


"डान्स तर चांगला आहे, पण मुलींचे कपडे का घातले आहेस?", असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "याचा स्टायलिश कोण आहे?", अशी कमेंट केली आहे. "याने अनन्याचा ब्लाऊज घातला आहे का?", "क्रिती सेनॉन कडून टॉप मागून घातला आहे का?", "श्रद्धा कपूरला तिचा टँक टॉप परत हवाय", अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. 

टायगर श्रॉफ 'बागी ४' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या 'बागी' या सिनेमाचा हा चौथा भाग आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सब्बीर खान यांनी केलं आहे. ५ सप्टेंबर २०२५ रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Web Title: tiger shroff gets troll for his crop top outfit in award show dance video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.