दिशासोबतच्या अफेअरवर टायगर श्रॉफने दिले हे उत्तर, वाचून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 13:52 IST2018-12-28T13:47:26+5:302018-12-28T13:52:18+5:30
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीच्या अफेअरची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून आहे. दिशा आणि टायगर अनेक वेळा लंच टेडवर किंवा पार्टीमध्ये एकत्र फिरताना दिसतात.

दिशासोबतच्या अफेअरवर टायगर श्रॉफने दिले हे उत्तर, वाचून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीच्या अफेअरची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून आहे. दिशा आणि टायगर अनेक वेळा लंच टेडवर किंवा पार्टीमध्ये एकत्र फिरताना दिसतात. त्यांनी आपलं नातं कधीच स्वीकारले नाही. सोशल मीडियावरदेखील नेहमीच त्यांच्या अफेअरच्या चर्चा असतात. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांनी 'बागी 2' सिनेमात पाहिली देखील. रसिकांना त्यांची केमिस्ट्री पसंत देखील पडली.
नुकताच एका मुलाखती दरम्यान टायगरने त्याच्या नात्याबाबत खुलासा केला आहे. एका सेलिब्रेटीच्या आयुष्याची चर्चा नेहमीच सगळीकडे सुरु असते त्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे हे जाणून घ्याची इच्छा सगळ्यांना असते हे मला माहिती आहे. दिशा आणि माझ्याकडे लोकांचे जास्तच लक्ष असते. आम्ही दोघे एकत्र खूप धमाल मस्ती करतो आणि एकमेकांची कंपनी एन्जॉय करतो. त्यामुळे या सगळ्या चर्चेचा आमच्या मैत्रीवर फरक नाही पडत.
टायगर श्रॉफबद्दल सांगायचे तर सध्या तो ‘स्टुडंट आॅफ द ईअर 3’मध्ये बिझी आहे. याशिवाय त्याने ‘बागी 3’चीही घोषणा केलीय. मार्च २०२० मध्ये ‘बागी 3’ प्रदर्शित होतोय. या सिनेमातून तरुणाईला घायाळ करण्यासाठी तसंच रसिकांची मने जिंकण्यासाठी तो टायगर मेहनत घेत आहे. ‘बागी’साठी टायगर वेगवेगळे स्टंट शिकतो आहे. आधीच्या दोन भागांपेक्षाही थरारक असे अॅक्शन स्टंट यात दिसणार आहे. हे स्टंट डिझाईन करण्यासाठी भारत आणि विदेशातील स्टंट डायरेक्टर्सची मदत घेतली जात आहे. ‘बागी2’ने यंदाच्या सर्वाधिक कमाई करणाºया चित्रपटांच्या यादीत स्थान कमावले होते. त्यामुळे ‘बागी3’कडून चाहत्यांना विशेष अपेक्षा आहेत.