Video : जान्हवी कपूरलाही पडली 'गणपत'मधील 'हम आए है' गाण्याची भुरळ; टागयरसोबत केला जबरदस्त डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 17:44 IST2023-10-18T17:42:05+5:302023-10-18T17:44:17+5:30
टायगर श्रॉफच्या 'गणपत' चित्रपटातील 'हम आए हैं' गाण्याची सोशल मीडियावर क्रेझ पाहायला मिळत आहे. या गाण्यावरील डान्स रीलचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Video : जान्हवी कपूरलाही पडली 'गणपत'मधील 'हम आए है' गाण्याची भुरळ; टागयरसोबत केला जबरदस्त डान्स
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या आगामी 'गणपत' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात प्रेक्षकांना पहिल्यांदाच टायगरचा वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे. ॲक्शन स्टार टायगर श्रॉफच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'गणपत' चित्रपटातील गाणीही सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत.
टायगर श्रॉफच्या 'गणपत' चित्रपटातील 'हम आए हैं' हे गाणं काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालं होतं. या गाण्याची सोशल मीडियावर क्रेझ पाहायला मिळत आहे. या गाण्यावरील डान्स रीलचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरलाही 'हम आए हैं' गाण्याची भुरळ पडली आहे. जान्हवीने टायगर श्रॉफबरोबर या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. टायगरने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत दोघेही 'हम आए हैं' गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.
'गणपत' चित्रपटात टायगर श्रॉफबरोबर अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहे. 'गणपत'मध्ये क्रिती पहिल्यांदाच ॲक्शन करताना दिसणार आहे. विकास बहल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा एक बिग बजेट सिनेमा असून हिंदी, तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.