'हम आए हैं' ची क्रेझ! टायगर आणि क्रितीच्या गाण्याचा इंटरनेटवर धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 06:36 PM2023-10-13T18:36:48+5:302023-10-13T18:37:10+5:30

सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत प्रत्येक जण 'हम आये हैं' गाण्याच्या हुक स्टेपवर नाचताना दिसतोय.

Tiger Shroff and Kriti Sanon's Dance Number 'Hum Aaye Hain' Sets Social Media Ablaze Ahead of 'Ganapath' Release | 'हम आए हैं' ची क्रेझ! टायगर आणि क्रितीच्या गाण्याचा इंटरनेटवर धुमाकूळ

Tiger Shroff and Kriti Sanon

सध्या सोशल मीडियावर एका गाण्याने धुमाकूळ घातला आहे. हे गाणं आहे टायगर श्रॉफच्या बहुप्रतीक्षित 'गणपत' चित्रपटातील 'हम आये हैं'. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत प्रत्येक जण 'हम आये हैं' गाण्याच्या हुक स्टेपवर नाचताना दिसतोय. या गाण्यावर भन्नाट रिल्स आणि व्हिडीओ बनत आहेत. तुम्ही इंस्टाग्रामवर स्क्रोल केल्यास, प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या रीलमध्ये गाणं ऐकू येईल. आता सर्वजण या गाण्यावर थिरकत आहेत.

नुकतचं  टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन स्टार 'गणपत' चित्रपटातील 'हम आये हैं' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. प्रदर्शित झाल्याच्या काही वेळातचं या गाण्याने लोकांना वेडं लावलं आहे. सोशल मीडियावर हे गाणं ट्रेंडमध्ये आहे.  टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉनच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीची जादू पाहायला मिळतीयं. 

'हीरोपंती'नंतर क्रिती सनॉन आणि टायगर श्रॉफची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. 'गणपत'चे दिग्दर्शन विकास बहल यांनी केलं आहे. तर हा चित्रपट हिंदी भाषेव्यतिरिक्त तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Tiger Shroff and Kriti Sanon's Dance Number 'Hum Aaye Hain' Sets Social Media Ablaze Ahead of 'Ganapath' Release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.