​टायगर- दिशाच्या लव्हस्टोरीचा THE END?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2016 17:37 IST2016-10-06T07:58:26+5:302016-10-08T17:37:57+5:30

टायगर श्रॉफ आणि त्याची कथित गर्लफ्रेन्ड दिशा पाटणी यांची लव्ह लाईफ निश्चित मुक्कामाला पोहोचण्याआधीच संपण्याच्या मार्गावर आहे. होय, टायगर व ...

Tiger-direction lovestore THE END? | ​टायगर- दिशाच्या लव्हस्टोरीचा THE END?

​टायगर- दिशाच्या लव्हस्टोरीचा THE END?

यगर श्रॉफ आणि त्याची कथित गर्लफ्रेन्ड दिशा पाटणी यांची लव्ह लाईफ निश्चित मुक्कामाला पोहोचण्याआधीच संपण्याच्या मार्गावर आहे. होय, टायगर व दिशाने परस्परांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळते. आता या निर्णयामागचे कारण विचाराल तर टायगरची आई. होय, टायगरची आई आयशा यांना हे नाते मंजूर नव्हते. जॅकी श्रॉफ यांना टायगर व दिशाच्या रिलेशनबद्दल कुठलीही तक्रार नव्हती. पण आयशा यांचा मात्र या नात्याला विरोध होता. टायगरला ही गोष्ट कळताच त्याने दिशापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. टायगर व दिशा परस्परांना डेट करत असल्याच्या बातम्या आयशा यांनी अनेकदा नाकारल्या आहेत. एका मुलाखतीदरम्यान, या बातम्या निराधार असल्याचे त्यांनी म्हटले होते. दोघेही चांगले मित्र आहेत. कारण दोघांचाही डान्स टिचर एक आहे. यापेक्षा टायगर व दिशा यांच्यात काहीही नाही, असे आयशा यांनी म्हटले होते.  



अलीकडे टायगर व दिशाच्या लव्ह लाईफची बरीच चर्चा सुरु होती. दिशा अनेकदा टायगरसोबत डिनर डेटवर दिसली. मात्र दोघांनीही कधीही आपले रिलेशन सार्वजनिक केले नव्हते. अर्थात आता ब्रेकअप म्हटल्यावर त्याची गरजही नाही!!

Web Title: Tiger-direction lovestore THE END?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.