रिलीजनंतरही पाहता येणार नाही ‘टायगर जिंदा है’; जाणून घ्या का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 15:31 IST2017-12-18T10:01:19+5:302017-12-18T15:31:19+5:30
या शुक्रवारी बॉक्सआॅफिसवरचे अनेक रेकॉर्ड तुटलेले तुम्ही पाहू शकाल. कारण या शुक्रवारी सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’ रिलीज होतो ...
.jpg)
रिलीजनंतरही पाहता येणार नाही ‘टायगर जिंदा है’; जाणून घ्या का?
य शुक्रवारी बॉक्सआॅफिसवरचे अनेक रेकॉर्ड तुटलेले तुम्ही पाहू शकाल. कारण या शुक्रवारी सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’ रिलीज होतो आहे. सलमान खान आणि कॅटरिना कैफ स्टारर या चित्रपटाच्या रिलीजची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहे. पण रिलीजच्या बाबतीतच एक अपडेट आहे. होय, येत्या शुक्रवारी ‘टायगर जिंदा है’ रिलीज होणार असला तरी कदाचित तुम्ही हा चित्रपट पाहू शकणार नाही. धक्का बसला ना? पण हे खरे आहे. याचे कारण म्हणजे, रिलीजआधीच हा चित्रपट हाऊसफुल आहे. बॉलिवूडचे जाणकार तरूण आदर्श यांनी एका टिष्ट्वटद्वारे ही माहिती दिली. ‘चित्रपटाची चांगली सुरूवात झाली आहे. अनेक सेंटरवरचे सर्व शो हाऊसफुल आहेत. शुक्रवारची सुरूवात तुफानी असेल, अशी अपेक्षा आहे,’ असे आदर्श यांनी लिहिले आहे.
ALSO READ : ‘टायगर जिंदा है’मध्ये नसणार ‘हा’ एक सीन!
खरे तर ‘टायगर जिंदा है’ एक धमाकेदार चित्रपट असणार यात काहीही शंका नाही. चित्रपटाचा ट्रेलर सुपरडुपर हिट राहिलाय. याची गाणीही लोकांच्या ओठांवर आहे. विशेषत: ‘स्वॅग से करेंगे सबका स्वागत’ हे गाणे प्रचंड लोकप्रीय झाले आहे. या चित्रपटात सलमान व कॅटरिनाची जोडी पाच वर्षांनंतर एकत्र दिसणार आहे.सलमान व कॅटरिना कैफ या दोघांची आॅनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासही चाहते उत्सूक आहे. १४० कोटी बजेट असलेल्या या चित्रपटात प्रेक्षकांना धमाकेदार अॅक्शन पाहायला मिळणार आहे. ‘सुल्तान’ फेम दिग्दर्शक अली अब्बास जफर हा चित्रपट दिग्दर्शित करतो आहे. हा चित्रपट ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा सीक्वल आहे. ‘एक था टायगर’ हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला होता. निश्चितपणे ‘टायगर जिंदा है’ ला आपल्या पहिल्या भागाचा फायदा मिळेल, असे गृहित धरले जात आहे. नाताळच्या मुहूर्तावर हा चित्रपट सोलो रिलीज असेल. त्यामुळे या सुट्टीचा लाभही ‘टायगर जिंदा है’ ला मिळणे अपेक्षित आहे.