Tiger 3 : सलमान खान-कतरिना कैफच्या 'टाइगर ३'चा दमदार पोस्टर आला समोर, या दिवशी येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 12:17 PM2023-09-02T12:17:50+5:302023-09-02T12:18:49+5:30

Tiger 3 : 'टायगर ३' चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले. यासोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही समोर आली आहे.

Tiger 3: The powerful poster of Salman Khan-Katrina Kaif's Tiger 3 is out, will be released on this day | Tiger 3 : सलमान खान-कतरिना कैफच्या 'टाइगर ३'चा दमदार पोस्टर आला समोर, या दिवशी येणार भेटीला

Tiger 3 : सलमान खान-कतरिना कैफच्या 'टाइगर ३'चा दमदार पोस्टर आला समोर, या दिवशी येणार भेटीला

googlenewsNext

सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ(Katrina Kaif)चा बहुप्रतीक्षित  चित्रपट 'टायगर ३' (Tiger 3) ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांना मोठे सरप्राईज देत निर्मात्यांनी शनिवारी सकाळी 'टायगर ३' चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले. यासोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही निश्चित झाली आहे.

सलमान खानने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर टायगर ३चे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केले आहे आणि चित्रपटाच्या रिलीजची तारीख देखील जाहीर केली आहे. सलमान खानने ट्विट केले की, "आ रहा हूं! टायगर ३ दिवाळी २०२३ ला. टायगर ३ YRF५० सह फक्त तुमच्या जवळच्या मोठ्या पडद्यावर साजरा करा. हिंदी, तमीळ आणि तेलगूमध्ये रिलीज होत आहे." पोस्टरमध्ये सलमान आणि कतरिना दोघांच्या हातात बंदूक दिसत आहे. हे पोस्टर पाहून असे म्हणता येईल की 'टायगर ३' 'टायगर'च्या पहिल्या दोन भागांपेक्षा मोठी आणि भव्य फ्रँचायझी असेल. 

२०१२ मध्ये रिलीज झालेल्या 'एक था टायगर' या फ्रेंचाइजीचा पहिल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवली होता. चित्रपटात सलमानला रॉ एजंट टायगर तर कतरिना आयएसआय एजंट झोयाच्या भूमिकेत दाखवण्यात आले होते. सलमान आणि कतरिनाच्या केमिस्ट्रीने रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घातला होता. यानंतर सलमान आणि कतरिनाने २०१७ मध्ये 'टायगर जिंदा है' या चित्रपटाच्या सीक्वलद्वारे पुनरागमन केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्डही मोडले.
'टायगर ३' हा लोकप्रिय 'वायआरएफ स्पाय युनिव्हर्स'चा पाचवा चित्रपट आहे आणि सहा वर्षांनंतर सलमान आणि कतरिना टायगर आणि झोयाच्या भूमिकेत कमबॅक करत आहेत. आता हा आगामी चित्रपट मागील चित्रपटांचे रेकॉर्ड मोडू शकेल की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Tiger 3: The powerful poster of Salman Khan-Katrina Kaif's Tiger 3 is out, will be released on this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.