Tiger 3 : सलमानचा 'टायगर ३' पाहून भारावली सचिनची लेक, सारा तेंडुलकरचं ट्वीट, म्हणाली, "हा चित्रपट..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 01:33 PM2023-11-14T13:33:06+5:302023-11-14T13:33:51+5:30

भाईजानचा हा चित्रपट पाहिल्यानंतर सारा भारावून गेली आहे. तिने 'टायगर ३'साठी खास पोस्ट लिहिली आहे.

tiger 3 sara tendulkar watched salman khan katrina kaif movie said sure shot blockbuster | Tiger 3 : सलमानचा 'टायगर ३' पाहून भारावली सचिनची लेक, सारा तेंडुलकरचं ट्वीट, म्हणाली, "हा चित्रपट..."

Tiger 3 : सलमानचा 'टायगर ३' पाहून भारावली सचिनची लेक, सारा तेंडुलकरचं ट्वीट, म्हणाली, "हा चित्रपट..."

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'टायगर ३' १२ नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहुर्तावर सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' या चित्रपटांचा 'टायगर ३' सिक्वेल आहे. सलमान खानच्या या चित्रपटासाठी प्रेक्षक आतुर होते. भाईजानच्या या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. जिकडे तिकडे सर्वत्र 'टायगर ३'ची क्रेझ पाहायला मिळत आहे. 'टायगर ३'ने चाहत्यांना भुरळ घातली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पुरेपूर उतरला असल्याचं चित्र आहे. नुकतंच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरने सलमानचा 'टायगर ३' पाहिला. 

साराने थिएटरमध्ये जाऊन 'टायगर ३' सिनेमा पाहिला. भाईजानचा हा चित्रपट पाहिल्यानंतर सारा भारावून गेली आहे. तिने 'टायगर ३'साठी खास पोस्ट लिहिली आहे. साराने 'टायगर ३' पाहिल्यानंतर एक्सवर एक ट्वीट केलं आहे. "नुकताच 'टायगर ३' पाहिला. हा चित्रपट नक्कीच ब्लॉकबस्टर होईल," असं तिने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. साराचं हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. या ट्वीटमध्ये तिने सलमान खानला टॅगही केलं आहे. 

सलमानच्या 'टायगर ३'ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी ४४ कोटींचा गल्ला जमवत सनी देओलच्या 'गदर २'चा रेकॉर्ड मोडला आहे. तर दुसऱ्या दिवशी 'टायगर ३'ने ५७ कोटींची कमाई केली आहे. ३०० कोटींच बजेट असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. 

6tgv

'टायगर ३'मध्ये सलमान खान, कतरिना कैफ, इमरान हाशमी यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर शाहरुख खान आणि हृतिक रोशन यांचा कैमिओ आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनिष शर्मा यांनी केलं आहे. सलमानच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 

Web Title: tiger 3 sara tendulkar watched salman khan katrina kaif movie said sure shot blockbuster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.