Tiger 3: ट्रेलर रिलीज पूर्वी 'टायगर ३'मधील कतरिना कैफचा अ‍ॅक्शन लूक आऊट, अभिनेत्री म्हणाली-हे माझ्यासाठी....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 12:51 IST2023-10-10T12:49:38+5:302023-10-10T12:51:27+5:30

'एक था टायगर ' आणि 'टायगर जिंदा है'च्या तुफान यशानंतर आता सलमान आणि कतरिनाच्या जोडीचा 'टायगर 3' रिलीज होण्यास सज्ज आहे

Tiger 3 katrina kaif first look as zoya out hold gun in salman khan movie poster | Tiger 3: ट्रेलर रिलीज पूर्वी 'टायगर ३'मधील कतरिना कैफचा अ‍ॅक्शन लूक आऊट, अभिनेत्री म्हणाली-हे माझ्यासाठी....

Tiger 3: ट्रेलर रिलीज पूर्वी 'टायगर ३'मधील कतरिना कैफचा अ‍ॅक्शन लूक आऊट, अभिनेत्री म्हणाली-हे माझ्यासाठी....

अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टायगर 3' ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. दिवाळीत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  'टायगर 3' ट्रेलर देखील लवकरच रिलीज होणार आहे. ट्रेलर रिलीजच्या आधी निर्मात्यांनी कतरिना कैफचा सिनेमातील लूक आऊट केला आहे. अभिनेत्रीचा अॅक्शन अवतार पाहून चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढली आहे. 

 'एक था टायगर ' आणि 'टायगर जिंदा है'च्या तुफान यशानंतर आता 'टायगर 3' रिलीज होण्यास सज्ज आहे. पुन्हा एकदा टायगर आणि झोयाची लव्हस्टोरी आणि अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. कतरिना कैफ या सिमेमात महिला गुप्तहेर झोयाची भूमिका साकारणार आहे.  सलमान खानने कतरिनाचा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती हातात बंदूक घेऊन गोळ्या झाडताना दिसत आहे. 

कतरिनाचा लूक पोस्टर शेअर करताना सलमान खानने लिहिले- झोया. 'टायगर 3' चा ट्रेलर 16 ऑक्टोबरला येतोय. 'टायगर 3' दिवाळीत हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज होणार आहे.

कतरिना म्हणते आपल्या भूमिकेबद्दल म्हणते, “अ‍ॅक्शन करणे नेहमीच रोमांचक असते आणि मी पूर्वीपासून अॅक्शनची फॅन आहे. त्यामुळे झोयाची भूमिका करणे हे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्या सारखे आहे.  लोक जेव्हा झोयाला पडद्यावर पाहतात तेव्हा त्यांच्या प्रतिक्रियेची मी आतुरतेने वाट पाहत आहे. 

मनीष शर्मा दिग्दर्शित 'टायगर 3' चित्रपटाचा ट्रेलर 16 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. तर चित्रपट दिवाळीत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.  सलमान खानसोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. 'एक था टायगर' (2012) आणि 'टायगर जिंदा है' (2017) बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले होते.
 

Web Title: Tiger 3 katrina kaif first look as zoya out hold gun in salman khan movie poster