रणवीर सिंगला 'या' सिनेमात टायगर श्रॉफने केले रिप्लेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 08:00 IST2018-08-31T16:55:29+5:302018-09-01T08:00:00+5:30
'बागी -2' मधून दमदार अॅक्शन दाखवत टायगर श्रॉफने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मीडिया रिपोर्टनुसार टायगर श्रॉफ संजय लीला भन्साळी यांच्या आगामी सिनेमात दिसण्याची शक्यता आहे.

रणवीर सिंगला 'या' सिनेमात टायगर श्रॉफने केले रिप्लेस
'बागी -2' मधून दमदार अॅक्शन दाखवत टायगर श्रॉफने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मीडिया रिपोर्टनुसार टायगर श्रॉफ संजय लीला भन्साळी यांच्या आगामी सिनेमात दिसण्याची शक्यता आहे. टायगर भन्साळी यांच्या ऑफिस बाहेर दिसला आहे.
आधी या सिनेमात भन्साळी रणवीर सिंगला कास्ट करणार होते. हा सिनेमा प्रसिद्ध लेखक अमीश त्रिपाठी यांच्या पुस्तकारवर आधारित आहे. यासिनेमासाठी भन्साळी आणि टायगरची अनेक वेळा चर्चा झाली आहे आणि दोघे ही अमीश यांच्यासोबत हात मिळवायला उत्सुक आहेत. अमीश त्रिपाठी यांचे प्रसिद्ध पुस्तक 'इमॉर्टल्स ऑफ मेलुहा'चे संजय लीला भन्साळी यांनी राईट्स विकत घेतले आहेत. याआधी 2014मध्ये करण जोहरने देखील राईट्स विकत घेतले होते मात्र काही कारणांमुळे ते गोष्टी पुढे झाल्या नाहीत आणि त्यांने राईट्स परत केल्या.
टायगर सध्या सिनेमांची लाईन लागली आहे. मात्र त्याला संजय लीला भन्साळी यांना डेट्स द्यायच्या आहेत कारणा ते टायगरच्या आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक आहेत. टायगरला ही संधी सोडायची नाही आहे.
लवकरच टायगर ‘स्टुडंट ऑफ द ईअर2’मध्ये मुख्य भूमिकेत आहे. यासिनेमातून त्यांच्यासोबत चंकी पांडेची लेक अनन्या पांडे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. तसेच आणखीन एक अभिनेत्री तारा सुतारियादेखील 'स्टुडंट ऑफ द इअर 2'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते. २०१२ मध्ये ‘स्टुडंट ऑफ द ईअर’ रिलीज झाला होता. तरूणाईने हा चित्रपट चांगलाच डोक्यावर घेतला होता. हा चित्रपट स्वत: करणने दिग्दर्शित केला होता. पण ‘स्टुडंट ऑफ द ईअर2’ पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित करतोय. पुनीतने याआधी ‘आय हेट लव्ह स्टोरी’ आणि ‘गोरी तेरे प्यार में’ सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.