या दिवशी प्रदर्शित होणार अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांचा ठग्स ऑफ हिंदोस्तान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 11:11 IST2018-09-17T13:23:01+5:302018-09-18T11:11:45+5:30
ठग्स आॅफ हिंदोस्तान हा चित्रपट विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित करत असून आमिर, अमिताभ यांच्यासोबतच या चित्रपटात सना शेख आणि कॅटरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या निर्मितीत कोणतीही कसर शिल्लक राहू नये याची काळजी घेतली आहे.

या दिवशी प्रदर्शित होणार अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांचा ठग्स ऑफ हिंदोस्तान
ठग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटाची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख कधी घोषित होणार याची लोकांना उत्सुकता लागली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच घोषित झाली असून ८ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या टीमने याबाबत अधिकृत घोषणा नुकतीच केली आहे.
ठग्स ऑफ हिंदोस्तान हा चित्रपट लार्जर दॅन लाइफ असावा यासाठी यशराज फिल्म्स प्रोडक्शन प्रचंड प्रयत्न करत आहे. अमिताभ बच्चन आणि आमिर खान हे दोघे अनेक वर्षं बॉलिवूड इंडस्ट्रीचा भाग असले तरी त्यांनी कधीच एकत्र चित्रपटात काम केले नव्हते. पण या दोन दिग्गज कलाकारांना या चित्रपटाद्वारे यश राजने एकत्र आणले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर ऐवजी या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार आहे. या मोशन पिक्चरद्वारे चित्रपटातील महत्त्वाच्या व्यक्तिरेखांची ओळख प्रेक्षकांना करून दिली जाणार आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेचे वेगळे पोस्टर असून ते वेगवेगळ्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस येईल असे म्हटले जात आहे.
ठग्स आॅफ हिंदोस्तान हा चित्रपट विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित करत असून आमिर, अमिताभ यांच्यासोबतच या चित्रपटात सना शेख आणि कॅटरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या निर्मितीत कोणतीही कसर शिल्लक राहू नये याची काळजी घेतली आहे. या चित्रपटाच्या आऊटडोअर चित्रीकरणासाठी निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाच्या काही दृश्यांचे चित्रीकरण माल्टा येथे करण्यात आले होते. या चित्रपटातील फँटसी, अॅक्शन हे प्रेक्षकांना खरेखुरे वाटावे यासाठी चित्रपटाच्या टीमने प्रयत्न केले आहेत. आजवर बॉलिवूडच्या इतिहासात कोणत्याच आऊटडोर चित्रीकरणाला इतका पैसा वापरण्यात आलेला नव्हता असे म्हटले जाते. या चित्रपटासाठी खास दोन जहाजांची निर्मिती देखील करण्यात आली असून या जहाजांचे वजन जवळजवळ दोन लाख किलोच्या आसपास आहे. ही जहाजं बनवण्यासाठी वर्षांहून अधिक काळ लागला होता. तसेच गेम्स ऑफ थ्रोन्स या प्रसिद्ध कार्यक्रमाचे चित्रीकरण ज्या समुद्रकिनारी झाले, तिथेच या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.