सासूमुळे ऐश्वर्याला कोसळलं होतं रडू, नेमकं काय म्हणाल्या होत्या जया बच्चन?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 01:41 PM2024-03-20T13:41:23+5:302024-03-20T13:44:43+5:30

सासूबाई जया यांच्यामुळे ऐश्वर्या रायच्या डोळ्यात अश्रू आले होते. 

Throwback: When Jaya Bachchan's words of praise left daughter-in-law Aishwarya Rai teary-eyed; video inside | सासूमुळे ऐश्वर्याला कोसळलं होतं रडू, नेमकं काय म्हणाल्या होत्या जया बच्चन?

सासूमुळे ऐश्वर्याला कोसळलं होतं रडू, नेमकं काय म्हणाल्या होत्या जया बच्चन?

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय विश्वसुंदरी म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. तर अभिनेत्री जया बच्चन चाहत्यांना कडक स्वभावाच्या वाटतात.
जया बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन या स्टार सासू सुनांची जोडी कायम चर्चेत असते. आता पुन्हा एकदा या सासू सुना चर्चेत आहेत आणि त्याचं कारण म्हणजे जया बच्चन यांची एक जुना व्हिडीओ आता पुन्हा व्हायरल होत आहे. सासूबाई जया यांच्यामुळे ऐश्वर्या रायच्या डोळ्यात अश्रू आले होते. 

 एक काळ असा होता, जेव्हा जया बच्चन आपल्या सुनेचं कौतुक करताना थकत नव्हत्या. असाच एक किस्सा आहे, जेव्हा सासूचं बोलणं ऐकून ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ऐश्वर्या रायचं लग्न अभिषेक बच्चनसोबत झालं होतं, तेव्हाची ही गोष्ट आहे. लग्नानंतर जया फिल्मफेअर अवॉर्ड शोमध्ये पोहचल्या होत्या. जिथे त्यांनी आपल्या लाडक्या सुनेचं खूप कौतुक केलं होतं. जे ऐकून माजी मिस वर्ल्ड खूप भावूक झाली होती. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये जया बच्चन म्हणतात की, 'मी एका सुंदर मुलीची सासू बनले आहे, जिच्याकडे  मूल्य आणि प्रतिष्ठा आहे. मलाही तिचं हसणं खूप आवडतं. बच्चन परिवारात मी तुझ स्वागत करते. मी तुला सांगू इच्छिते की, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे'. सासूच्या या भाषणानंतर प्रेक्षकांमध्ये बसलेली ऐश्वर्या खूपच भावूक झाली. व्हिडीओमध्ये ऐश्वर्याच्या  शेजारी अभिषेक बच्चनही बसलेला दिसत आहे. जया या अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी ऐश्वर्याचं कौतुक करताना दिसल्या आहेत.
 

Web Title: Throwback: When Jaya Bachchan's words of praise left daughter-in-law Aishwarya Rai teary-eyed; video inside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.