THROWBACK : दिवसरात्र रडायची ऐश्वर्या राय, ही अभिनेत्री ठरली होती कारण!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 16:00 IST2021-03-24T15:58:57+5:302021-03-24T16:00:15+5:30
सलमान खानसोबतची तिची लव्हस्टोरी सगळ्यांना माहित आहे. पण सलमानआधी ऐश्वर्याचे नाव आणखी एकाशी जोडले गेले होते.

THROWBACK : दिवसरात्र रडायची ऐश्वर्या राय, ही अभिनेत्री ठरली होती कारण!!
ऐश्वर्या राय बच्चन सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करतेय. सलमान खानसोबतची तिची लव्हस्टोरी सगळ्यांना माहित आहे. पण सलमानआधी ऐश्वर्याचे नाव आणखी एकाशी जोडले गेले होते. त्याचे नाव होते राजीव मूलचंदानी. मनीषा कोईरालाच्या बॉयफ्रेन्डच्या यादीतही हे नाव होते.
मॉडेलिंगच्या दुनियेत राजीव मूलचंदानी हे एक मोठे नाव आहे. 90 च्या दशकात राजीव एक लोकप्रिय मॉडेल होता. करिअरच्या सुरुवातीच्या काळात ऐश्वर्याच्या आयुष्यात राजीवची एन्ट्री झाली होती. 1994 मध्ये ऐश्वर्या मिस वर्ल्ड बनली आणि तिच्या घराबाहेर निर्माता-दिग्दर्शकांची रांग लागली. ऐशलाही मॉडेलिंगपेक्षा चित्रपटात रस होता. ऐश्वर्याने लगेच काही सिनेमे साईनही केले. पण ‘जीन्स’, ‘और प्यार हो गया’ सारखे तिचे चित्रपट आपटले आणि ऐश्वर्या अचानक फ्लॉप अभिनेत्रींच्या रांगेत जाऊन बसली. एकीकडे ऐश्वर्यावर फ्लॉपचा टॅग लागला होता. दुसरीकडे मनीषा कोईराला मात्र यशाच्या शिखरावर होती. याचदरम्यान 1994 मध्ये मनीषाने एका मॅगझिनला एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीने खळबळ माजली.
काय म्हणाली होती मनीषा
मी राजीवला डेट करतेय आणि माझ्यासाठी राजीवने ऐश्वर्याला सोडले, असे मनीषाने या मुलाखतीत सांगितले. मनीषाच्या या खुलाशाने ऐश्वर्याची स्थिती काय झाली असावी, याचा अंदाजही आपण बांधू शकत नाही. ऐश्वर्या दिवसरात्र नुसती ढसाढसा रडत होती.
ऐश्वर्याने दिले होते जशास तसे उत्तर
ऐश्वर्या व राजीवच्या ब्रेकअपबद्दल बोलणा-या मनीषाला ऐश्वर्याने सणसणीत उत्तर दिले होते. 1999 मध्ये एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या यावर बोलली होती. ती म्हणाली होती की, ‘मी राजीव व मनीषाच्या लव्हस्टोरीचा भाग नाही. दोन महिन्यानंतरच मनीषा व राजीवचे ब्रेकअप झाले झाले होते. मनीषा प्रत्येक महिन्याला बॉयफ्रेन्ड बनवते. खरे तर तामिळमधील ‘बॉम्बे’मधील मनीषाचा अभिनय पाहून मी तिला शुभेच्छा देतणार होते. पण मनीषाने माझ्याबद्दल पुन्हा आग ओकल्याचे मला कळले. मला राजीवने लिहिलेले लव्हलेटर पाहिल्याचे तिने सर्वांना सांगितले. हा माझ्यासाठी मोठा धक्का होता. माझ्यामुळे मनीषा व राजीवचे ब्रेकअप झाले असेल तर तिने एकदाच सर्व काही सांगून टाकावे. चार वर्षांनंतर पुन्हा एकदा हा मुद्दा उखरून काढण्याचा अर्थ काय? मनीषाने रेखा व श्रीदेवीसारख्या सीनिअर्सची कदर केली नाही तर मी तिच्यासाठी कोण आहे? तरीही ती आपल्या आयुष्यात आनंदी राहो, एवढेच मी म्हणेल.’