सोनलला रोज कुणीतरी पाठवतयं हजारो गुलाब..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 21:15 IST2016-05-13T15:45:04+5:302016-05-13T21:15:04+5:30

बॉलिवूड अभिनेत्रींना चाहत्यांची कमी नाहीच..‘जन्नत’या चित्रपटात आपल्या सौंदर्यांने अनेकांना वेड लावणारी बॉलिवूड ब्युटी सोनल चौहान ही सुद्धा यापैकी एक़ अगदी आत्ता आत्ता सोनलच्या घरी आठ हजार गुलाबांच्या फुलांची भेट पोहोचली. गेल्या काही दिवसांपासून सोनलचा एक़ वेडा चाहता तिला रोज गुलाबाची फुले पाठवत आहे.

Thousands of sweets are sent daily to Sonalala .. | सोनलला रोज कुणीतरी पाठवतयं हजारो गुलाब..

सोनलला रोज कुणीतरी पाठवतयं हजारो गुलाब..

लिवूड अभिनेत्रींना चाहत्यांची कमी नाहीच..‘जन्नत’या चित्रपटात आपल्या सौंदर्यांने अनेकांना वेड लावणारी बॉलिवूड ब्युटी सोनल चौहान ही सुद्धा यापैकी एक़  अगदी आत्ता आत्ता सोनलच्या घरी आठ हजार गुलाबांच्या फुलांची भेट पोहोचली. पण ही सुंदर लालचुटूक गुलाबाची फुले पाठवणारा कोण? हे खुद्द सोनललाही ठाऊक नाही. आठ हजार लाल गुलाब पाठवणारा प्रेमवेडा कोण, हे जाणून घेण्यास सोनल उत्सूक आहेच. तूर्तास तरी तिलाही हे माहिती नाही. पण तरिही ही अनोखी भेट सोनलने स्वीकारली आहे. या गुलाबांसोबचा एक फोटो सोनलने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. सोबतच तिच्या अज्ञात चाहत्यासाठी संदेशही लिहिला आहे. आठ हजार गुलाबांची फुले आणि तरिही तू कोण, हे मला ठाऊक नाही. तुझे आभार मानण्याचा हाच एकमेव मार्ग आहे...असे सोनलने लिहिलेय... गेल्या काही दिवसांपासून सोनलचा हा वेडा चाहता तिला रोज गुलाबाची फुले पाठवत आहे. सोनलचे घर त्यामुळे गुलाबाच्या फुलांनी जणू बहरून आले आहे... सो कूल ना??


Web Title: Thousands of sweets are sent daily to Sonalala ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.