सोनाली बेंद्रेसोबत या पाकिस्तानी क्रिकेटरला थाटायचा होता संसार, पर्समध्ये ठेवायचा अभिनेत्रीचा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 16:13 IST2023-10-14T16:12:11+5:302023-10-14T16:13:07+5:30
Sonali Bendre : पाकिस्तानच्या या क्रिकेटरने सोनाली बेंद्रेवर क्रश असल्याचे एका मुलाखतीत कबूल केले होते.

सोनाली बेंद्रेसोबत या पाकिस्तानी क्रिकेटरला थाटायचा होता संसार, पर्समध्ये ठेवायचा अभिनेत्रीचा फोटो
आजच्या तरुण पिढीमध्ये जशी पाकिस्तानी स्टार्सची क्रेझ आहे, त्याचप्रमाणे पाकिस्तानमध्येही बॉलिवूड स्टार्सची फॅन फॉलोईंग प्रचंड आहे. पण आज आम्ही तुम्हाला त्या अभिनेत्रीच्या फॅन्सबद्दल सांगणार आहोत, जो त्याच्या फास्ट स्पीडमुळे पाकिस्तानच नाही तर जगभर प्रसिद्ध होता. आम्ही शोएब अख्तर(Shoaib Akhtar )बद्दल बोलत आहोत आणि त्याला सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) खूप आवडायची. इतकी आवडायची की त्याच्या पर्समध्ये तिचा फोटो असायचा.
शोएब अख्तरने एकदा एका मुलाखतीत कबूल केले होते की सोनाली बेंद्रेवर त्याचा खूप क्रश होते. इतके की त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. त्याचा प्रस्ताव मान्य होण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, असे तो म्हणाला होता. सोनालीने त्याचा प्रस्ताव नाकारला तर तो तिचे अपहरण करेल, असेही त्याने म्हटले होते. तो फक्त विनोद करत असला तरी शोएब अख्तरचे विधान व्हायरल झाले होते.
अभिनेत्रीचा पर्समध्ये ठेवायचा फोटो
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली त्याला किती आवडते हे शोएब अख्तरच्या सहकाऱ्यांनाही माहीत असल्याचं म्हटलं जातं. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावाही करण्यात आला होता की, शोएब सोनालीचा फोटो त्याच्या पर्समध्ये ठेवायचा. मात्र नंतर शोएबने असे काहीही बोलण्यास नकार दिला असला तरी चाहत्यांचा त्याच्यावर विश्वास नाही.
अशी झाली होती भेट
शोएबने सांगितले होते की, अशाच भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान तो सोनाली बेंद्रेला भेटला होता पण ही त्यांची पहिली आणि शेवटची भेट होती.