ही चिमुकली आहे बॉलिवूड कुटुंबातील सून; तिच्या सुंदरतेवर लाखो फिदा, डायहार्ट फॅन्सही ओळखण्यात करतील चूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 16:43 IST2023-05-11T16:39:35+5:302023-05-11T16:43:07+5:30
फोटोत भावाच्या शेजारी बसलेल्या या मुलीने अभिनयाच्या जगात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. भल्याभल्यांना तिला ओळखणं कठीण जातंय.

ही चिमुकली आहे बॉलिवूड कुटुंबातील सून; तिच्या सुंदरतेवर लाखो फिदा, डायहार्ट फॅन्सही ओळखण्यात करतील चूक
सेलेब्सच्या बालपणीच्या फोटोमध्ये आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीची झलक दाखवणार आहोत, जी कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. फोटोत आपल्या भावाच्या शेजारी गोंडसपणे बसलेली ही मुलगी आज इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाते. बॉलिवूडमध्येच नव्हे तर साऊथच्या चित्रपटांमध्येही तिची चर्चा होणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. एवढेच नाही तर आज ती एका दिग्गज अभिनेत्याची सून आहे आणि अभिनेत्याची पत्नी आहे.
ओळखलंत की नाही? आम्ही तुम्हाला सांगतो ही चिमुकली कोण आहे ते. हा फोटो ऐश्वर्या राय बच्चनचा बालपणीचा फोटो आहे, ज्यामध्ये ती तिच्या भावासोबत दिसत आहे. 1994 मध्ये मिस वर्ल्डचा किताब पटकावणाऱ्या ऐश्वर्याला आज फॅन्स अॅशच्या नावाने हाक मारतात. तिने केवळ बॉलीवूडमध्येच नाही तर तमिळ, बंगाली आणि हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. इतकंच नाही तर बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते.
ऐश्वर्या राय बच्चन ही ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची सून आणि अभिषेक बच्चन यांची पत्नी आहे. त्याच वेळी, तिला एक मुलगी आराध्या बच्चन आहे, जी तिच्या आईची कॉपी आहे आणि चाहत्यांनी ती सुद्धा खूप आवडते.
देवदास, धूम आणि ए दिल है मुश्किल, द लास्ट लीजनमध्ये काम केलेली बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय सध्या चर्चेत आहे. तिच्या 'पोन्नियिन सेल्वन २' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.