फोटोत भावासोबत दिसणारी ही चिमुकली आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, ओळखलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 04:25 PM2023-07-04T16:25:17+5:302023-07-04T16:32:27+5:30

फोटोत आपल्या भावाच्या शेजारी गोंडसपणे बसलेली ही मुलगी आज इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाते.

This girl with brother is miss world and bollywood actress name | फोटोत भावासोबत दिसणारी ही चिमुकली आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, ओळखलंत का?

फोटोत भावासोबत दिसणारी ही चिमुकली आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, ओळखलंत का?

googlenewsNext

सेलेब्सच्या बालपणीच्या फोटोमध्ये आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीची झलक दाखवणार आहोत, जी कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. फोटोत आपल्या भावाच्या शेजारी गोंडसपणे बसलेली ही मुलगी आज इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाते. बॉलिवूडमध्येच नव्हे तर साऊथच्या चित्रपटांमध्येही तिची चर्चा होणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. एवढेच नाही तर आज ती एका दिग्गज अभिनेत्याची सून आहे आणि अभिनेत्याची पत्नी आहे.
 
ओळखलंत की नाही? आम्ही तुम्हाला सांगतो ही चिमुकली कोण आहे ते. हा फोटो ऐश्वर्या राय बच्चनचा बालपणीचा फोटो आहे, ज्यामध्ये ती तिच्या भावासोबत दिसत आहे. 1994 मध्ये मिस वर्ल्डचा किताब पटकावणाऱ्या ऐश्वर्याला आज फॅन्स अॅशच्या नावाने हाक मारतात. फक्त सौंदर्यचंच नाही तर आपल्या टॅलेंटच्या जोरावर ऐश्वर्या राय हिने मिस वर्ल्डचा किताब पटकावला होता. जेव्हा तिने हा ताज घातला त्यावेळी ती फक्त २१ वर्षांची होती. तिने ८६ देशांतील सौंदर्यवतींना मागे टाकत हा किताब पटकावला होता. आजही ऐश्वर्याच्या सौंदर्यांची जगभर चर्चा होताना दिसते. या स्पर्धेनंतर ऐश्वर्याला सिनेमांच्या ऑफर्स येऊ लागल्या. त्यानंतर तिने अभिनयाला आपले प्रोफेशन बनवले. 

तिने केवळ बॉलीवूडमध्येच नाही तर तमिळ, बंगाली आणि हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. इतकंच नाही तर बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. ऐश्वर्या राय बच्चन ही ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची सून आणि अभिषेक बच्चन यांची पत्नी आहे. त्याच वेळी, तिला एक मुलगी आराध्या बच्चन आहे, जी तिच्या आईची कॉपी आहे आणि चाहत्यांनी ती सुद्धा खूप आवडते. शेवटची ऐश्वर्या नुकतीच पोन्नियन सेल्वन २ मध्ये झळकली आहे.
 

Web Title: This girl with brother is miss world and bollywood actress name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.