प्रियांका की दीपिका! आईच्या खांद्यावर बसलेल्या चिमुकलीला ओळखलं का? बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 01:53 PM2022-03-06T13:53:55+5:302022-03-06T13:54:31+5:30

Actress: या फोटोमध्ये ही अभिनेत्री तिच्या आईच्या खांद्यावर बसली आहे. इतकंच नाही तर तिचं गोड स्मित हास्य अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

this girl sitting on mothers shoulder has worked in hollywood | प्रियांका की दीपिका! आईच्या खांद्यावर बसलेल्या चिमुकलीला ओळखलं का? बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही केलंय काम

प्रियांका की दीपिका! आईच्या खांद्यावर बसलेल्या चिमुकलीला ओळखलं का? बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही केलंय काम

googlenewsNext

आपल्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणं हा सध्या एक नवा ट्रेंडचं सुरु झाला आहे. त्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांच्या बालपणीचे, शालेय जीवनातील फोटो शेअर केले आहेत. यात अनेक सेलिब्रिटींनी त्यांचे ग्रुप फोटो शेअर करतही ओळखा पाहू कोण? असं चॅलेंजही चाहत्यांना दिलं आहे. यामध्येच सध्या एका बॉलिवूड अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यावर तिला पटकन ओळखणंही अनेकांना कठीण झालं आहे. 

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो एका दिग्गज अभिनेत्रीचा आहे. तिने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही काम केलं आहे. त्यामुळे आज तिचा देशासह विदेशातही मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. या फोटोमध्ये ही अभिनेत्री तिच्या आईच्या खांद्यावर बसली आहे. इतकंच नाही तर तिचं गोड स्मित हास्य अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

फोटोमध्ये दिसणारी ही अभिनेत्री पाहिल्यावर अनेकांनी ती प्रियांका चोप्रा किंवा दीपिका पदुकोण असल्याचं म्हटलं आहे. परंतु, हा फोटो या दोन्ही अभिनेत्रींचा नसून हुमा कुरैशीचा (Huma Qureshi) आहे. 

दरम्यान, हुमाने आतापर्यंत अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच ती आर्मी ऑफ द डेड या हॉलिवूड चित्रपटातही झळकली आहे. हुमाला कुटुंबाकडूनच कलेचा वारसा मिळाला आहे. तिचा भाऊ साकिब सलीमदेखील (Saqib Saleem) बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. 

Web Title: this girl sitting on mothers shoulder has worked in hollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.